शाळांमध्ये रामायण, महाभारताचे धडे; शिक्षण मंत्रालयाला पाठविला अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 08:38 AM2023-11-22T08:38:20+5:302023-11-22T08:39:17+5:30
याबाबतचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठविला आहे.
संजय शर्मा
नवी दिल्ली : महाभारत आणि रामायण आता शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. एनसीईआरटीच्या सोशल सायन्स समितीने याबाबतचा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठविला आहे.
एनसीईआरटीने नवीन शिक्षण धोरण लागू करण्यासाठी पाठ्यपुस्तकात काही बदल करण्यासाठी १९ तज्ज्ञांची एक उच्चस्तरीय सोशल सायन्स समिती स्थापन केली होती. समितीने वैदिक गणितासह वेद आणि आयुर्वेदही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
अहवालात काय?
अहवालात म्हटले आहे की, भारतीय इतिहासही तीन ऐवजी चार भागांमध्ये शिकवला जावा. आजवर इतिहास प्राचीन भारत, मध्यकालीन भारत व आधुनिक भारत या नावाने शिकवला जात आहे. आता क्लासिकल पिरियड, मिडवल, ब्रिटिश काळ व आधुनिक भारत या नावाने इतिहास शिकवला जावा, असे म्हटले आहे.