डिसेंबरात अयोध्येमध्ये रामायण परिषद
By admin | Published: July 2, 2016 04:06 AM2016-07-02T04:06:21+5:302016-07-02T04:06:21+5:30
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनेच नरेंद्र मोदी सरकारने राम मंदिराचा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनेच नरेंद्र मोदी सरकारने राम मंदिराचा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले असून, त्यासाठी डिसेंबरात अयोध्येमध्ये जागतिक रामायण परिषद आयोजित करण्यात येणार आहे. अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती आणि तिथे राम मंदिर बांधण्याची घोषणा भाजप नेते वारंवार करीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीच हे सारे सुरू असल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून, त्याची अधिसूचना जानेवारी महिन्यात निघेल, असे सांगण्यात येते. त्यापूर्वीच रामायण परिषदेच्या निमित्ताने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करणार नाही, असे भाजपा नेते सांगत असले तरी वेगळ्या प्रकारे तेच करण्याचा मोदी सरकार उत्तर प्रदेशात करेल, असे दिसत आहे.
उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य असून, ते जिंकणे हा भाजपासाठी प्रतिष्ठेचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>ही जागतिक परिषद डिसेंबरातच भरवण्याचे नेमके कारण काय, हे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
शिवाय त्या काळात परिषद घेण्याचे विशेष प्रयोजनही नाही. केवळ उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ती आयोजित करण्यात येत असल्याचे कळते.