मोदींवर टीका केल्याने रामचंद्र गुहा यांना धमक्या
By admin | Published: March 29, 2017 01:18 PM2017-03-29T13:18:19+5:302017-03-29T13:20:27+5:30
मोदी आणि भाजपावर टीका केल्यास आता दैवी शक्ती तुम्हाला शिक्षा देतील अशा धमक्या ईमेलद्वारे देण्यात येत असल्याचं रामचंद गुहा बोलले आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याने आपल्याला धमक्या देणारे ई-मेल येत असल्याचं इतिहास संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी सांगितलं आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. मोदी आणि भाजपावर टीका केल्यास आता दैवी शक्ती तुम्हाला शिक्षा देतील अशा धमक्या ईमेलद्वारे देण्यात येत असल्याचं रामचंद गुहा बोलले आहेत.
58 वर्षीय रामचंद्र गुहा यांची अनेक पुस्तकं लोकप्रिय असून महात्मा गांधी यांच्यासंबंधी त्यांचं लिखाण वाचकांच्या पसंतीस उतरलं आहे. रामचंद्र गुहा यांना भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका न करण्याची धमकी मिळाली आहे.
रामचंद गुहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे की, 'गेल्या काही दिवसांपासून मला धमक्यांचे मेल येत आहेत. भाजपावर टीका करत असल्याने दैवी शक्तीच्या शिक्षेसाठी तयार राहा'. रामचंद्र गुहा यांनी अजून एक ट्विट केलं असून 'मला भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची जग बदलण्यासाठी दैवी शक्तीने निवड केली आहे त्यांच्यावरही टीका न करण्याची धमकी मिळाली असल्याचं', सांगितलं आहे.
Many people/ids sending identical mails warning me to "get ready to be punishment (sic) by Divine Mahakal" for being critical of the BJP.
— Ramachandra Guha (@Ram_Guha) March 28, 2017
मेल पाठवणा-यांनी स्वत:ला दैवी भारतीय म्हटलं असून गुहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची इंदिरा गांधींसोबत आणि अमित शहा यांची संजय गांधींसोबत तुलना न करण्याचीही धमकी दिली आहे.
I am also warned not to criticize Narendra Modi and Amit Shah who "are blessed & divine chosen one by Divine Mahakal to change the world".
— Ramachandra Guha (@Ram_Guha) March 28, 2017
मात्र रामचंद्र गुहा यांनी अशा धमक्या येणं माझ्यासाठी नियमित असून याला गंभीरतेने गरज घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. मात्र रामचंद्र गुहा यांनी धमकी देणा-यांची नावे जाहीर केलेली नाहीत.
कोण आहेत रामचंद्र गुहा -
रामचंद्र गुहा एक प्रसिद्ध इतिहास संशोधक आहेत. नुकतेचं सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नव्या प्रशासकांची नियुक्ती केली असून रामचंद्र गुहा यांचाही यात समावेश आहे. रामचंद्र गुहा यांना क्रिकेटचीही तितकीच आवड असून प्रथम श्रेणी क्रिकेटबद्द्ल त्यांना दांडगी माहिती आहे. या विषयावर देश - विदेशातील अनेक महत्वाच्या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केलं आहे. आपल्या सामाजिक आणि राजकीय लिखाणासाठीही रामचंद्र गुहा यांना ओळखलं जातं. . 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'इंडिया आफ्टर गांधी' हे त्यांचं जास्त चर्चा केलं गेलेलं लिखाण. ‘इंडिया आफ्टर गांधी’, ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’, ‘पॅट्रियटस् अॅण्ड पार्टिज्न्स’ आदी पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. अनेकदा आपलं मत ते ट्विटरच्या माध्यमातूनच मांडत असतात.