'मेरे पार्टी का मैं हू अकेला', आठवलेंच्या कवितांनी सभागृहात एकच हशा पिकला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 07:50 PM2022-12-07T19:50:04+5:302022-12-07T19:52:19+5:30
Ramdas Athawale : रामदास आठवले यांच्या भाषणादरम्यान नेहमीप्रमाणे हशा पिकला आणि त्यांच्या कवितेला उपस्थित खासदारांनीही चांगला प्रतिसाद दिला.
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्या अभिनंदन आणि स्वागतपर भाषण केले. मंत्री नाही केलं म्हणून मी काँग्रेसची साथ सोडल्याचं सांगताना रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ही कवितेनेच केली. त्यांच्या भाषणादरम्यान नेहमीप्रमाणे हशा पिकला आणि रामदास आठवले यांच्या कवितेला उपस्थित खासदारांनीही चांगला प्रतिसाद दिला.
रामदास आठवले म्हणाले,
"आदरणीय महोदय,
मैं तो अन्याय के खिलाफ लढा हूँ,
इसलिए आपको बधाई देने के लिए खडा हूँ,
आपका अनुभव बहुतही बडा है,
इसलिए आपने संघर्ष का पहाड चढा है,
मेरे पार्टी का मैं हू अकेला,
लेकीन मेरे हाथ में है संविधान का पेला,
मैं तो हूँ आपका सच्चा चेला,
मुझे मत छोडो अकेला.
जिन्होंने उपराष्ट्रपती का सर किया है गड,
उनका नाम है धनकड
हमें मिलकर उखाड देनी है विषमता की जड,
इसमें जरूर सफल होंगे आदरणीय धनकड
हाऊस में जो सदस्य करेंगे फॅक्शन,
उनके उपर होनी चाहिए कडी अॅक्शन
हमें तो मजबूत करना हैं भारत नेशन,
क्योंकी हंगामा करने की हमें नही चाहिए फॅशन”
दरम्यान, रामदास आठवले आपली कविता सादर करत असताना इतर खासदार त्यांना अधूनमधून दाद देत होते. याचबरोबर, रामदास आठवले पुढे म्हणाले, "तुम्ही मोठा संघर्ष करून याठिकाणी पोहोचला आहात, गावातील एका शेतकऱ्याचा मुलगा ते इथपर्यंत तुम्ही उच्च पदापर्यंत आला आहात. तुमचा अनुभव आणि संघर्ष मोठा आहे. तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये काम करणं अवघड होतं. पण तुम्ही ते आव्हान लीलया पेललं. बंगालमध्ये तुम्ही चांगलं काम केलं म्हणूनच तुम्ही इथेपर्यंत पोहोचू शकला आहात. तिथे तुम्ही चांगलं काम केलं नसतं, तर कदाचित तुम्हाला हे पद मिळणं अवघड होतं."