UP Elections 2022: “उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपने आरपीआयसोबत लढली पाहिजे”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:41 AM2021-09-16T11:41:16+5:302021-09-16T12:13:13+5:30

सहारनपूर येथून रॅली काढणार असून, जवळपास ७५ जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

ramdas athawale says BJP should fight the next UP polls in alliance with RPI | UP Elections 2022: “उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपने आरपीआयसोबत लढली पाहिजे”: रामदास आठवले

UP Elections 2022: “उत्तर प्रदेशातील निवडणूक भाजपने आरपीआयसोबत लढली पाहिजे”: रामदास आठवले

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका भाजपने आरपीआयसोबत युती करून लढायला हव्याभाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा द्याव्यात

लखनऊ: आगामी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र, आतापासूनच उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. जवळपास सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका भाजपने आरपीआयसोबत युती करून लढायला हव्या, असे म्हटले आहे. (ramdas athawale says BJP should fight the next UP polls in alliance with RPI)

“अयशस्वी देशाकडून धडे घेण्याची गरज नाही”; काश्मीरवरून भारताने पाकला फटकारले

रामदास आठवले यांनी रॅलीची घोषणा केली आहे. २६ सप्टेंबरला सहारनपूर येथून रॅली काढणार असून, जवळपास ७५ जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे ते म्हणाले. आरपीआय (आठवले) २६ सप्टेंबरला सहारनपूर येथून रॅली काढणार आहे. ७५ जिल्ह्यांमध्ये ही रॅली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ही विचारधारेची लढाई, तडजोड नाही; संघ, भाजपवर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा दिल्या पाहिजेत

भाजपाने आरपीआयशी युती करून आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा द्याव्यात. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून, भाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल असे सांगितले आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या ३५ वर्षांत कुठलाही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना योगींनी मै आऊंगा ना म्हणत मी पुन्हा येईन... असेच म्हटले आहे. तसेच, आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलो आहोत, माझा जो ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार, भाजपला ३५० पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असे म्हणत एकहाती सत्ता येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ramdas athawale says BJP should fight the next UP polls in alliance with RPI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.