Ramdas Athawale : "आजाद को बहुत सालों बाद मिली आजादी.."; रामदास आठवलेंची गुलाम नबी आझादांना पक्ष प्रवेशाची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:21 PM2022-08-28T12:21:31+5:302022-08-28T12:33:50+5:30

Ramdas Athawale And Ghulam Nabi Azad : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये आझाद यांना थेट पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे.

Ramdas Athawale Tweet Over Ghulam Nabi Azad resignation from congress | Ramdas Athawale : "आजाद को बहुत सालों बाद मिली आजादी.."; रामदास आठवलेंची गुलाम नबी आझादांना पक्ष प्रवेशाची ऑफर

Ramdas Athawale : "आजाद को बहुत सालों बाद मिली आजादी.."; रामदास आठवलेंची गुलाम नबी आझादांना पक्ष प्रवेशाची ऑफर

googlenewsNext

नवी दिल्ली - देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील दिग्गज नेते असलेल्या गुलाम नबी आझाद यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याबातत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीविषयी मोठी घोषणा केली. आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. सोनिया गांधी यांना पाच पानांचं पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले. 

काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाने देशभरात काँग्रेस जोडो अभियान सुरू केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी (Ramdas Athawale) आपल्या खास शैलीमध्ये आझाद यांना थेट पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे. आपल्या ट्विर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आजाद को बहुत सालों बाद मिली आजादी’। ‘गुलाम नबी अब नहीं रहे राहुलवादी, अब उनको मिल गयी सही आजादी। जम्मू कश्मीर की खुश है दादी, राहुल गांधी की छीन ली है गादी। गुलाम नबी आझाद जी ने बीजेपी या आरपीआय मे आते है तो स्वागत है!" असं आठवले यांनी म्हटलं आहे. 

"आझाद हे आरपीआयमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत"

गुलाम नबी आझाद हे भाजपामध्ये येणार असतील किंवा आरपीआयमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना सांगितले की, आता मी जम्मू-काश्मीरमध्ये परतणार आहे. तसेच तिथे मी माझ्या नव्या पक्षाची स्थापना करणार आहे. मात्र भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट शब्दात फेटाळले आहे. माझे विरोधात गेल्या तीन वर्षांपासून मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठवत आहेत. तसेच त्यांनी मला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही बनवून टाकले होते, अशी टिप्पणी आझाद यांनी केली.

"काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र"

आझाद यांनी राहुल गांधींवरही टीका करत आरोपांच्या फैरी झाडली होती. ते म्हणाले की, जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आहे आणि २०१३ मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले. तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले. सध्या राहुल गांधी हे अननुभवी लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेलेले आहेत. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र आहेत. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. यापेक्षा वाईत शब्दांत सांगायचं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते. 
 

Web Title: Ramdas Athawale Tweet Over Ghulam Nabi Azad resignation from congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.