रामदेव बाबांचे पतंजली नूडल्स वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: November 19, 2015 05:02 AM2015-11-19T05:02:07+5:302015-11-19T05:02:07+5:30
योगगुरू बाबा रामदेव यांनी बाजारात आणलेल्या पतंजली आटा नूडल्सच्या विक्रीसाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाकडून (एफएसएसएआय) परवानगीच घेतली
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी बाजारात आणलेल्या पतंजली आटा नूडल्सच्या विक्रीसाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरणाकडून (एफएसएसएआय) परवानगीच घेतली नसल्याचे उघड झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
आटा नूडल्सच्या विक्रीसाठी पतंजलीला कोणतीही परवानगी अथवा परवाना मंजूर करण्यात आलेला नाही, असे एफएसएसएआयचे
अध्यक्ष आशिष बहुगुणा यांनी सांगितले. आटा नूडल्सच्या विक्रीसाठी पूर्व परवानगी वा मंजुरी घेण्याची
गरज आहे, असेही बहुगुणा यांनी
स्पष्ट केले.
पतंजलीचा खुलासा
केंद्रीय श्रेणीमध्ये पास्तासाठी आपल्याला एफएसएसएआयकडून परवाना मिळालेला आहे आणि एफएसएसएआयच्या व्याख्येनुसार नूडल्स ‘पास्ता’ या श्रेणीमध्येच मोडते. शिवाय कंपनीला रिलेबलिंगचा परवाना मिळालेला आहे. त्यामुळे आपण अन्य कंपन्यांकडून नूडल्स खरेदी करून आणि त्याचे रिलेबलिंग करून विकू शकतो, असा खुलासा पतंजलीने एका निवेदनात केला आहे.