बाबा रामदेवचे "अच्छे दिन", आता संसदेतही पतंजली

By admin | Published: March 30, 2017 07:53 PM2017-03-30T19:53:19+5:302017-03-30T19:53:19+5:30

मोदी सरकार आल्यापासून योग गुरू बाबा रामदेव यांचे अच्छे दिन सुरू झालेत असंच म्हणावं लागेल.

Ramdev's "good days", now Patanjali in Parliament | बाबा रामदेवचे "अच्छे दिन", आता संसदेतही पतंजली

बाबा रामदेवचे "अच्छे दिन", आता संसदेतही पतंजली

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - मोदी सरकार आल्यापासून योगगुरू बाबा रामदेव यांचे अच्छे दिन सुरू झालेत असंच म्हणावं लागेल. केंद्रासह अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून पतंजलीला चांगलाच फायदा होत असल्याची चर्चा आहे. द टेलीग्राफच्या ज्येष्ठ पत्रकार अनिता जोशुआ यांच्यानुसार आता संसदेतही पतंजलीचे पदार्थ मिळण्यास सुरूवात झाली आहे. जोशुआ यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. 
 
यापुर्वी, भाजपाचं सरकार असलेल्या मध्य प्रदेशमध्ये सरकारी रेशनच्या दुकानात बाबा रामदेव यांचे पतंजली पदार्थांची विक्री होणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.  तेथील राज्यमंत्री विश्वास सारंग यांनी मीडियाला याबाबत माहिती दिली होती. बदलत्या काळानुसार रेशन दुकानांमध्ये पतंजलीच्या पदार्थांच्या विक्रीला सुरूवात होईल असं त्या म्हणाल्या होत्या.  याशिवाय दार जिल्ह्यामध्ये 500 कोटींच्या फूड प्रोसेसिंग युनिटसाठी 400 एकर जमीन देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.  
तसेच नागपूरमध्येही 250 एकर जागेत पतंजली फूड पार्क उभा राहणार आहे. पतंजलीला 75 टक्के सूट देऊन जमीन देण्यात आल्याचा आरोपही फडणवीस सरकारवर झाला होता.   
 
भाजपाशासीत राज्य आसाममध्येही पतंजलीसाठी जमीन देण्यात आली आहे. येथील तेजपूरमध्ये मेगा फूड पार्कसाठी 150 एकर जमीन देण्यात आली आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार रामदेव यांनी उद्योग मंत्री चंद्र मोहन पटवारी यांची भेट घेऊन आणखी 33 एकर जमीनीची मागणी केल्याचं वृत्त आहे.
 
इतकंच नाही तर भारतीय सुरक्षा दलाचे जवानही बाबा रामदेव यांचे पतंजलीचे पदार्थांचा वापर करताना दिसणार आहेत. बीडब्ल्यूडब्ल्यूएने याबाबत पतंजली आयुर्वेद लिमिटेडसह सहमती पत्रावर स्वाक्षरी केली असल्याचं समजतंय. यानुसार देशभरात बीएसएफ परिसरात बीडब्ल्यूडब्ल्यूए पतंजलीची दुकानं सुरू करणार असल्याचं वृत्त आहे.   
  
 
 
 
  
 
 

Web Title: Ramdev's "good days", now Patanjali in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.