रमेशचंद्र अग्रवाल यांचे हृदयविकाराने निधन

By admin | Published: April 13, 2017 01:13 AM2017-04-13T01:13:07+5:302017-04-13T01:13:07+5:30

देशातील आघाडीच्या दैनिक भास्कर प्रकाशनगृहाचे अध्यक्ष रमेश चंद्र अग्रवाल (७३) यांचे बुधवारी येथील विमानतळावर आगमन होताच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

Ramesh Chandra Agrawal dies in heart attack | रमेशचंद्र अग्रवाल यांचे हृदयविकाराने निधन

रमेशचंद्र अग्रवाल यांचे हृदयविकाराने निधन

Next

अहमदाबाद : देशातील आघाडीच्या दैनिक भास्कर प्रकाशनगृहाचे अध्यक्ष रमेश चंद्र अग्रवाल (७३) यांचे बुधवारी येथील विमानतळावर आगमन होताच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
दैनिक भास्कर समूहाच्या गुजरातेतून प्रकाशित होणाऱ्या दैनिक ‘दिव्य भास्कर’च्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल येथे येताच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. हॉस्पिटलने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विमानातून अग्रवाल उतरताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेचच सकाळी ११.२५ वाजता हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात आणण्यात आले होते. वैद्यकीय तुकडीला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ प्रयत्न करूनही हृदय पुन्हा कार्यरत करता आले नाही व त्यांना १२.०५ मिनिटांनी मृत घोषित करण्यात आले. अग्रवाल यांच्यावर गुरुवारी भोपाळमध्ये अंत्यविधी होईल.

भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवालजी यांच्या निधनाने मोठा धक्का बसला. त्यांनी हिंदी पत्रकारितेला नवा आयामच दिला नाही तर नव्या उंचीवर नेऊन पोहचविले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक स्तंभ राहिलेल्या रमेशजींनी हिंदी प्रिंट मीडियाला जनमानसात लोकप्रियता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका वठविली. त्यांच्या निधनाने मी एक सहृदयी मित्र गमावला आहे. भास्कर आणि अग्रवाल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे.
- विजय दर्डा, माजी राज्यसभा सदस्य आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन

Web Title: Ramesh Chandra Agrawal dies in heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.