ेेेत्र्यंबकेश्वर येथे रंगपंचमी उत्साहात

By Admin | Published: March 12, 2015 11:07 PM2015-03-12T23:07:58+5:302015-03-13T00:14:03+5:30

त्र्यंबकेश्वर : बुधवारी रंगपंचमीनिमित्त संपूर्ण त्र्यंबकनगरी रंगाने न्हाऊन निघाली होती. दुपारनंतर सर्व दुकाने बंद; पण त्र्यंबक नगरीतील तरुणाईच्या अंगात रंग भरला होता. डीजेच्या तालावर रंगमिश्रित पाण्याने तरुण-तरुणी भिजत होत्या. जाणार्‍या येणारांवर रंग उडविणे चालू होते.

At the Rameshbankeshwar festival | ेेेत्र्यंबकेश्वर येथे रंगपंचमी उत्साहात

ेेेत्र्यंबकेश्वर येथे रंगपंचमी उत्साहात

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : बुधवारी रंगपंचमीनिमित्त संपूर्ण त्र्यंबकनगरी रंगाने न्हाऊन निघाली होती. दुपारनंतर सर्व दुकाने बंद; पण त्र्यंबक नगरीतील तरुणाईच्या अंगात रंग भरला होता. डीजेच्या तालावर रंगमिश्रित पाण्याने तरुण-तरुणी भिजत होत्या. जाणार्‍या येणारांवर रंग उडविणे चालू होते.
संपूर्ण गावात रंगमय वातावरण होते. लहान मुुले आपापसांत एकमेकांना रंग लावित होते, तर दुपारी युवक-युवतीनीं खेळण्याचा आनंद घेतला. गेल्या ३ वर्षांपासून रंगाच्या गाड्या बंद केल्याने आता एका जागी डीजे लाऊन रंग खेळला गेला.
पाण्याने चिंब भिजत तोंडाला चित्र-विचित्र रंग लावून आपल्या मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन त्यांनाही रंगात सामील करून घेतले जात होते. त्र्यंबकला पाच दिवस शिमगा चालतो. यावर्षी सहाव्या दिवशी रंगपंचमी होती. काहींनी पाच दिवस होळी विझू दिली नव्हती. (वार्ताहर)
-----

Web Title: At the Rameshbankeshwar festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.