रामेश्वर कॉलनीत तरुणाला घरात घुसून मारहाण जिल्हा रुग्णालयात दाखल : रक्तबंबाळ अवस्थेत पोहचला पोलीस ठाण्यात

By admin | Published: October 26, 2016 11:55 PM2016-10-26T23:55:18+5:302016-10-26T23:55:18+5:30

जळगाव: जुन्या वादातून हर्षल दत्तू पाटील (वय २५) या तरुणाला पाच जणांना लोखंडी सळई व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता रामेश्वर कॉलनीत घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनला पोहचला, तेथून त्याला रिक्षाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Rameshwar Colony, a young man, enters the house and is admitted to Marhan district hospital: Arrested in a bloody police station | रामेश्वर कॉलनीत तरुणाला घरात घुसून मारहाण जिल्हा रुग्णालयात दाखल : रक्तबंबाळ अवस्थेत पोहचला पोलीस ठाण्यात

रामेश्वर कॉलनीत तरुणाला घरात घुसून मारहाण जिल्हा रुग्णालयात दाखल : रक्तबंबाळ अवस्थेत पोहचला पोलीस ठाण्यात

Next
गाव: जुन्या वादातून हर्षल दत्तू पाटील (वय २५) या तरुणाला पाच जणांना लोखंडी सळई व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी अकरा वाजता रामेश्वर कॉलनीत घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनला पोहचला, तेथून त्याला रिक्षाने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेबाबत जखमी तरुण व त्याच्या आईने दिलेली माहिती अशी की, हर्षल पाटील या तरुणाचे लग्न दीड वर्षापूर्वी मामा विजय तानाजी पाटील यांच्या रिंकू नावाच्या मुलीशी झालेले होते. काही कारणास्तव चार महिन्यापूर्वी दोघांचा घटस्फोट झाला. दोघंही एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. बुधवारी हर्षलची आई मिनाक्षी पाटील या विजय पाटील याच्या घराकडे फराळ बनविणार्‍या कारागिराकडे गेली असता तेथे शुभम विजय पाटील याने तू या गल्लीत कशी आली असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. फराळासाठी लागणारा झारा उचलून त्यांच्या अंगावर धावून गेला. या प्रकारानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्यापाठोपाठ विजय पाटील त्यांचा मुलगा शुभम,आशीष, मुलगी रिंकू व पत्नी रेखा आदी जण मिनाक्षी यांच्या घराकडे आले असता हर्षल कंपनीतून रात्रपाळीची ड्युटी करुन घरी झोपलेला असताना या सर्वांना त्याला मारहाण केली. त्यात डोक्यात जबर मार बसला तर हातातील बोटांनाही जखम झाली. त्यामुळे तो तसाच पोलीस स्टेशनला गेला. मुलाला रक्तबंबाळ पाहून आई मिनाक्षी या जागेवरच बेशुध्द पडल्या. त्यांनाही नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
कोट..
जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले होते. रुग्णालयातून एमएलसी आल्यावर गुन्हा दाखल केला जाईल.
-सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक

Web Title: Rameshwar Colony, a young man, enters the house and is admitted to Marhan district hospital: Arrested in a bloody police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.