मोदींवरून रामलीला कमिटीत वाद
By Admin | Published: September 27, 2015 05:21 AM2015-09-27T05:21:39+5:302015-09-27T05:21:39+5:30
काँग्रेस नेते आणि माजी खासदार जे. पी. अग्रवाल यांनी शुक्रवारी रामलीला मैदान कमिटीच्या मुख्य संरक्षणपदाचा राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी खासदार जे. पी. अग्रवाल यांनी शुक्रवारी रामलीला मैदान कमिटीच्या मुख्य संरक्षणपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर दसऱ्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याला विरोध दर्शवीत अग्रवाल यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
दसऱ्याच्या कार्यक्रमाला मोदी यांना निमंत्रित करण्यास अग्रवाल यांचा विरोध होता; परंतु मोदींना निमंत्रित करावेच लागेल, असे आम्ही त्यांना सांगितले. पण त्यांनी त्याचा विरोध केला. आम्हाला हा विरोध मान्य नसल्याने त्यांनी अखेर राजीनामा दिला, असे कमिटीचे अध्यक्ष ओ. पी. कत्याल यांनी सांगितले. गेल्या वर्षीदेखील मोदींना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलेले नव्हते. त्यांच्याऐवजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात आले होते. गेल्या वर्षी मोदी रावण दहनासाठी नजीकच्याच सुभाष मैदानावर गेले होते. (वृत्तसंस्था)