राममंदिर जमीन व्यवहार वादात; सपा, काँग्रेसनेही केली चाैकशीची मागणी, ट्रस्टने आराेप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:47 AM2021-06-15T06:47:28+5:302021-06-15T06:47:37+5:30

बंधित जमीन १८ मार्च राेजी सुल्तान अन्सारी आणि रवी माेहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. हा व्यवहार सायंकाळी झाला हाेता. 

Rammandir land transaction dispute; SP, Congress also demanded Inquiry, the trust rejected the allegations | राममंदिर जमीन व्यवहार वादात; सपा, काँग्रेसनेही केली चाैकशीची मागणी, ट्रस्टने आराेप फेटाळले

राममंदिर जमीन व्यवहार वादात; सपा, काँग्रेसनेही केली चाैकशीची मागणी, ट्रस्टने आराेप फेटाळले

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अयाेध्येतील राममंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घाेटाळा झाल्याचा आराेप हाेत आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टी आणि ‘आप’ यांच्यापाठाेपाठ काॅंग्रेसने केली आहे.

‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सर्वप्रथम या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आराेप केला हाेता.  व्यवहारासाठी खरेदी करण्यात आलेल्या स्टॅंप पेपरच्या वेळांबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला.  प्रियंका गांधी ट्विट केले की, काेट्यवधी लाेकांनी आस्था आणि भक्तिभावाने ईश्वरचरणी दान अर्पण केले. त्याचा दुरुपयाेग अधर्म आणि पाप असून, लाेकांच्या श्रद्धेचा अपमान आहे. 

काही मिनिटांत झाला संशयास्पद व्यवहार
संबंधित जमीन १८ मार्च राेजी सुल्तान अन्सारी आणि रवी माेहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. हा व्यवहार सायंकाळी झाला हाेता. 
त्यानंतर पाच मिनिटांमध्येच ट्रस्टने ही जागा १८.५ काेटी रुपयांमध्ये खरेदी केली. अवघ्या काही मिनिटांमध्येच भूखंडाची किंमत एवढ्या प्रमाणात वाढली.

बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदीचा दावा
ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आराेप फेटाळले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर येथील जमिनीचे भाव वाढले आहेत. 
संबंधित जमीन रेल्वेस्थानकाजवळ अतिशय माेक्याच्या ठिकाणी आहे. तरीही बाजारभावापेक्षा कमी भावात जमीन खरेदी केल्याचा दावा राय यांनी केला आहे.

... तर चाैकशी करू
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव माैर्या यांनी सांगितले, की सकृतदर्शी या व्यवहारात गैरव्यवहार दिसत नाही. मात्र, तसे आढळल्यास चाैकशी करू.

Web Title: Rammandir land transaction dispute; SP, Congress also demanded Inquiry, the trust rejected the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.