रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल
By Admin | Published: June 24, 2017 02:55 AM2017-06-24T02:55:15+5:302017-06-24T02:55:15+5:30
राष्ट्रपतीपदाचे भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज शुक्रवारी लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात जाऊ
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज शुक्रवारी लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात जाऊ न सादर केला आणि त्यामुळे त्यांचा राष्ट्रपती भवनात जाण्याचा मार्ग सुकर झाला. कोविंद यांनी अर्जाचे तीन सेट लोकसभा महासचिवांकडे सादर केले. निवडणूक अर्जाचा चौथा सेट ते २८ जून रोजी सादर करणार आहेत.
त्यांच्याविरोधात विरोधकांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार रिंगणात असल्या तरी १७ जुलै रोजी होणारी निवडणूक ही केवळ उपचार असेल. मतदानानंतर तीन दिवसांनी म्हणजे २0 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत २४ जुलै रोजी संपणार आहे.
कोविंद यांचा विजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासह जवळपास सर्व केंद्रीय मंत्री, भाजप व रालोआशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हेही रामनाथ कोविंद निवडणूक अर्ज दाखल करताना यांच्यासोबत होते.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मनोहरलाल खट्टर, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि अण्णा द्रमुकच्या दुसऱ्या गटाचे नेते माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे त्यात होते. अर्ज भरल्यानंतर कोविंद म्हणाले की, मी बिहारचा राज्यपाल झालो, तेव्हाच मी सक्रिय राजकारणापासून दूर झालो होतो. तेव्हाच राजकारणापलीकडील व्यक्ती झालो. राष्ट्रपती म्हणूनही मी राजकारणाशी संबंध नसलेला व्यक्ती म्हणूनच काम करेन आणि माझी राष्ट्रपती म्हणून असलेलीच कर्तव्ये बजावेन.
ठाकरेंची अनुपस्थिती
कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणे टाळणे भाजपाला खटकेल आहे. शिवाय ठाकरेंनी आपला प्रतिनिधी म्हणूनही कोणाला पाठविले नव्हते आणि हीच बाब भाजप नेत्यांना सर्वात जास्त खटकली. एवढेच नाही तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनीही यावेळी संसद संकुलात उपस्थित राहणे टाळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी विमानाने दिल्लीला येणार होते. त्यांनी ठाकरेंना तुम्ही येणार असाल तर माझ्यासोबत येऊ शकता, असे सुचविले होते.
चर्चा होऊ न जाऊ देत : मीरा कुमार : राष्ट्रपतीपदासाठी उभे असलेले दोन्ही उमेदवार केवळ दलित आहेत, याकडे महत्त्व न देता, त्यांचे आतापर्यंतचे कार्य, अनुभव आणि प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी जाहीरपणे चर्चा व्हायला हवी, असे आव्हान काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांनी कोविंद यांना दिले.
याचा काहीही अर्थ
काढू नये. आम्ही कोविंद यांचे नाव सुचविले असून, आम्ही त्यांना मतदान करणार आहोत. कोकणात आमचा आज कार्यक्रम होता आणि सर्व प्रमुख नेते त्यात सहभागी झाले होते.
- खा. संजय राऊत, शिवसेनेचे नेते