Video - फ्लायओव्हरवर उभा राहिला अन् नोटांचा वर्षाव सुरू केला; पैसे गोळा करायला लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 02:34 PM2023-01-24T14:34:01+5:302023-01-24T14:35:07+5:30

फ्लायओव्हरवर चढून एका व्यक्तीने 10 रुपयांच्या नोटांचा हवेत वर्षाव केला. त्याच्याकडे 10 रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल होते.

random person stood on flyover in bangalore threw 10 rs notes viral video | Video - फ्लायओव्हरवर उभा राहिला अन् नोटांचा वर्षाव सुरू केला; पैसे गोळा करायला लोकांची झुंबड

Video - फ्लायओव्हरवर उभा राहिला अन् नोटांचा वर्षाव सुरू केला; पैसे गोळा करायला लोकांची झुंबड

Next

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एक अजब घटना घडली आहे. येथे सिटी मार्केटजवळील फ्लायओव्हरवर चढून एका व्यक्तीने 10 रुपयांच्या नोटांचा हवेत वर्षाव केला. त्याच्याकडे 10 रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल होते. एक एक करून त्याने बंडल उघडत नोटांचा वर्षाव केला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नोटांचा वर्षाव करणारा व्यक्ती कोण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. हे कृत्य करणारी व्यक्ती कोण आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती फ्लायओव्हरवरून नोटांचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे. खाली उभा असलेला जमाव त्या नोटा उचलत आहे. जेव्हा त्या व्यक्तीने नोटांचा वर्षाव सुरू केला तेव्हा तेथे बरेच लोक जमा झाले. 

गेल्या वर्षी हैदराबादमधूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. येथे एका व्यक्तीने 500 रुपयांच्या अनेक नोटांचा हवेत वर्षाव केला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये कुर्ता-पायजमा घातलेला एक व्यक्ती उंच जागेवर उभा राहून 500 च्या नोटांचा वर्षाव करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याने नोटांचा वर्षाव सुरू करताच खाली उभ्या असलेल्या जमावाने त्या नोटा उचलण्यास सुरुवात केली.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: random person stood on flyover in bangalore threw 10 rs notes viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा