...अन् अखेर विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मवरून गायब होणार 'कमळ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 11:11 IST2020-02-19T10:44:15+5:302020-02-19T11:11:19+5:30
लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे.

...अन् अखेर विद्यार्थ्यांच्या युनिफॉर्मवरून गायब होणार 'कमळ'
कोलकाताः दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातील रानिया प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींना ड्रेसवर कमळ फुलाचं चिन्ह वापरण्याच्या सक्तीचा जबरदस्त विरोध झाला आहे. लोकांचा विरोध पाहता शाळेनं ड्रेसवरची कमळाच्या फुलाची सक्ती हटवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीएमसीच्या काही नेत्यांनी याविरोधात शाळेच्या गेटवर प्रदर्शन केलं होतं.
या प्रकरणी शिक्षक प्रभारी बिजाली दास यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या आम्ही 11-12 वर्षांपासून या फुलाच्या चिन्हाचा वापर करत आहोत. कारण कमळ आपलं राष्ट्रीय फूल आहे. अचानक काही लोकांनी यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्ही ते चिन्ह बदलण्याचा विचार केला. आम्ही लवकरच 'सर्व शिक्षा मिशन'चे अभियान राबवणार आहोत.
दास म्हणाल्या, विरोध प्रदर्शनामध्ये टीएमसीच्या लोकांचा समावेश होता. परंतु कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी याचा विरोध केलेला नाही. दुसरीकडे यावरून राजकारण सुरू झालं आहे. तृणमूलच्या सरकारनं याला भाजपाची रणनीती असल्यास सांगत स्कूलच्या प्रशासनाबरोबर मिळून भाजपा प्रचार आणि प्रसार करत आहे. दुसरीकडे भाजपानं तृणमूलचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.Bijali Das, Teacher Incharge: Suddenly some people have started raising objections so we thought of changing it. We will soon start using the logo of 'Sarva Shiksha Mission'. People who were protesting includes TMC Councillor but no parents have protested. https://t.co/b2Sb70qXDW
— ANI (@ANI) February 18, 2020