खंडणी उकळणाऱ्याचा छडा लागलाच नाही

By admin | Published: January 6, 2016 01:52 AM2016-01-06T01:52:40+5:302016-01-06T01:52:40+5:30

नागपूर : अलीकडच्या काळातील नागपुरातील सर्वात मोठी खंडणी ठरलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हेशाखेचे पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, डझनभर गुन्हेगारांची झाडाझडती घेऊनही अद्याप खंडणी उकळणाऱ्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

The ransom could not be cut | खंडणी उकळणाऱ्याचा छडा लागलाच नाही

खंडणी उकळणाऱ्याचा छडा लागलाच नाही

Next
गपूर : अलीकडच्या काळातील नागपुरातील सर्वात मोठी खंडणी ठरलेल्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी गुन्हेशाखेचे पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, डझनभर गुन्हेगारांची झाडाझडती घेऊनही अद्याप खंडणी उकळणाऱ्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
अजय श्यामराव राऊत (वय ४५) या बुकी कम बिल्डरचे अपहरण करून त्याच्याकडून अपहरणकर्त्यांनी १ कोटी ७५ लाखांची खंडणी उकळली. १३ डिसेंबर २०१५ ला दिवसाढवळ्या ही घटना घडली. नागपूर शहरातील आतापर्यंतची सर्वात मोठी खंडणी असल्यामुळे पोलीस खंडणीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, खंडणी देणारा राऊतच माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने पोलिसांच्या तपासात अडसर निर्माण झाला आहे. मात्र, पोलिसांनी घटनाक्रम आणि प्रत्यक्षदर्शीच्या माहितीचा आधार घेत मेंढे, मरसकोल्हे, लक्ष्मण, हरचंदानी, मुणोतसह डझनभर व्यक्तींना गुन्हेशाखेत आणून खंडणी उकळणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न चालविले आहे. आजपावेतोच्या माहितीवरून दिवाकरचे नाव सर्वत्र घेतल्या जात असल्यामुळे पोलीस त्याचा कसून तपास करीत आहे. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नसल्याने या प्रकरणातील अनेक बाबी अंधारात आहेत. दरम्यान, बाहेर वावरणाऱ्या गुन्हेगारांसोबतच कारागृहात असलेल्यांवरही पोलिसांनी नजर केंद्रित केली असून, मुंबई टूर करणाऱ्यावर तसेच एका बुकीवरही पोलीस जाळे टाकण्याच्या तयारीत आहेत.
---

Web Title: The ransom could not be cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.