पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 12:31 IST2025-02-18T12:29:44+5:302025-02-18T12:31:35+5:30

युट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये पालकांबद्दल अश्लील विधान केल्या प्रकरणीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.

Ranveer Allahbadia latest news ranveer allahbadia supreme court strict comment on ranveer allahbadia samay raina india s got latent | पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश

पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश

एका यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात असभ्य व वादग्रस्त वक्तव्य केल्याने अडचणीत आलेला इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादि याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. रणवीर इलाहाबादिया याने शोमध्ये दिलेल्या विधानावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने रणवीर याला त्याने केलेल्या टिप्पणीबद्दल फटकारले. न्यायालयाने म्हटले की, त्यांचे मन घाणेरडे आहे. अशा व्यक्तीची केस आपण का ऐकावी?

कोडिंग ते लाईव्ह गेम, एलन मस्क यांचा मोठा दावा; जगातील सर्वात स्मार्ट Grok 3 AI लाँच

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, त्यांचे मन घाणेरडे आहे. अशा व्यक्तीची केस आपण का ऐकावी? लोकप्रिय असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू शकता. तुम्ही लोकांच्या पालकांचा अपमान करत आहात. तुमच्या मनात काही घाण आहे असे दिसते.

"विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करण्यात आले आहे, त्यामुळे संपूर्ण समाजाला लाज वाटेल. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये असे आदेश न्यायालयाने रणवीरला दिले आहेत. रणवीरला त्याचा पासपोर्ट पोलीस ठाण्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

न्यायालयाने काय सांगितलं?

रणवीर अलाहाबादिया विरोधात दाखल झालेल्या अनेक एफआयआरच्या संदर्भात न्यायालयाने त्याला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायालयाने एफआयआर एकत्रित करण्याच्या त्याच्या याचिकेवर नोटीस बजावली आणि महाराष्ट्र, आसाम आणि जयपूरमध्ये नोंदवलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या अटकेला अंतरिम स्थगिती दिली. न्यायालयाने रणवीर इलाहाबादिया याला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले.

"चौकशीत त्यांच्या सहभागाला कोणताही धोका असल्यास, त्यांना जीवन आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आणि आसामच्या स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्याचे स्वातंत्र्य असेल, असंही न्यायालयाने म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

रणवीर इलाहाबादियाने स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये गेस्ट जज म्हणून सहभाग घेतला होता. या भागात, त्याने स्पर्धकाला त्यांच्या पालकांच्या लैंगिक जीवनाबद्दल वादग्रस्त प्रश्न विचारले. रणवीरच्या या प्रश्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओमुळे लोकांनी संताप व्यक्त केला. आसामपासून जयपूरपर्यंत रणवीर अलाहाबादियाविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
 

Web Title: Ranveer Allahbadia latest news ranveer allahbadia supreme court strict comment on ranveer allahbadia samay raina india s got latent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.