शरीरावर सोन्याची बिस्कीटे बांधून आणायची, प्रत्येक ट्रिपसाठी मिळायचे ₹13 लाख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 21:59 IST2025-03-05T21:57:39+5:302025-03-05T21:59:07+5:30
अभिनेत्री रन्या रावला 12.56 कोटी रुपयांच्या सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

शरीरावर सोन्याची बिस्कीटे बांधून आणायची, प्रत्येक ट्रिपसाठी मिळायचे ₹13 लाख...
Ranya Rao Smugging Case: कन्नड अभिनेत्री आणि मॉडेल रन्या राव हिला सोन्याची तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तिला बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी तिच्या जॅकेटमध्ये लपवलेले 14.2 किलो विदेशी सोने जप्त केले, ज्याचे अंदाजे बाजार मूल्य 12.56 कोटी रुपये आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नागावरा येथील डीआरआय कार्यालयात नेण्यात आले.
प्रत्येक ट्रिपमधून लाखोंची कमाई
मिळालेल्या माहितीनुसार, रन्या राव ही कर्नाटक पोलीस दलामधील डीजीपी रामचंद्र राव यांची कन्या असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, रन्या रावने गेल्या वर्षी दुबईला 30 वेळा प्रवास केल्याचाही तपासात खुलासा झाला आहे. प्रत्येकवेळी तिने काही किलो सोने लपवून भारतात आणले आणि प्रत्येक किलोसाठी तिला 1 लाख मिळाल्याची माहितीही समोर आली आहे. म्हणजेच, प्रत्येक ट्रिपमधून रन्या 12 ते 13 लाख रुपये कमावयची.
15 दिवसांत 4 वेळा दुबई ट्रिप
तीन महिन्यांपूर्वी रन्याचे भव्य लग्न झाले. तिने प्रसिद्ध आर्किटेक्ट जितीन हुक्केरी यांच्याशी लग्न केले आहे. विशेष म्हणझे, त्यांचा कोणताही व्यवसाय नसताना ती गेल्या 15 दिवसांत 4 वेळा दुबईला गेली. नुकताच त्यांनी एक आलिशान फ्लॅट खरेदी केला, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर प्रश्न उपस्थित झाले होते. यामागे तस्करीचे मोठे नेटवर्क आहे का, याचा तपास संबंधित अधिकारी करत आहेत.
विमानतळावरी कॉन्स्टेबलची मदत
बंगळुरू विमानतळावर तैनात कॉन्स्टेबल बसवराजने रन्याला मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने रन्याला पळून जाण्यात मदत केली, पण डीआरआय टीम तिच्यावर आधीच लक्ष ठेवून होती, त्यामुळे रन्याला रंगेहात पकडले. रन्या एक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तपास अधिकारीदेखील विविध अँगलने या घटनेचा तपास करत आहेत.
रन्याच्या घरातून कोट्यवदीची जप्ती
रन्याच्या अटकेनंतर अधिकाऱ्यांनी 4 मार्च रोजी तिच्या घरावर छापा टाकला. येथून 2.67 कोटी रुपयांची रोकड आणि 2.06 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या छाप्यात तीन मोठे खोकेही जप्त करण्यात आले असून, एकूण जप्तीची किंमत 17.29 कोटी रुपये झाली आहे. 1962 च्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत रन्या रावला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.