Raosaheb Danave: '...म्हणून शिवसेनेचं शुद्ध तुपाच्या दुकानासारखं, आम्ही हिंदुत्त्ववादी, आम्ही हिंदुत्त्ववादी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 02:49 PM2022-03-22T14:49:51+5:302022-03-22T15:59:36+5:30
दानवेंनी एमआयएम ही भाजपची बी नाही, झेड टीमसुद्धा होऊ शकत नाही. कारण, काँग्रेस, कम्युनिष्ट आणि एमआयएम हेच आमचे शत्रू आहेत, असे दानवेंनी स्पष्टच सांगितले.
नवी दिल्ली - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी 'एमआयएम'ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांना केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यापुढे त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर, राज्याच्या राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे. तर, शिवसेनेनं पुढे येऊन एमआयएम ही भाजपची बी टीम असून त्यांना महाविकास आघाडीत स्थान नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. याबाबत, आता भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) MIM चा कट उधळवून लावा. ती भाजपाची बी टीम आहे, असं सांगत त्यांच्यासोबत युती करण्यास नकार दिला आहे. त्यावर, दानवेंनी एमआयएम ही भाजपची बी नाही, झेड टीमसुद्धा होऊ शकत नाही. कारण, काँग्रेस, कम्युनिष्ट आणि एमआयएम हेच आमचे शत्रू आहेत, असे दानवेंनी स्पष्टच सांगितले. शिवसेना आमचा मित्र होता, आता तो पूर्व मित्र आहे. जनतेचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि एमआयएमने टाकलेली ही गुगली आहे. मात्र, या गुगलीनंतर शिवसेनेच्याच विरोधतल्या प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत. शिवसेनाच एमआयएमसोबत हातमिळवणी करतेय का, अशी चर्चा सुरू आहे. म्हणूनच, शुद्ध तुपाच्या दुकानासारखं, आम्ही हिंदुत्ववादी.. आम्ही हिंदुत्वावादी.. असं शिवसेनेला सांगावं लागतंय.
एमआयएम युतीबाबत काय म्हणाले शरद पवार
कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'एमआयएम'सोबत जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.
२५ आमदार संपर्कात
महाविकास आघाडीचे बरेच आमदार सरकारवर तीव्र नाराज आहेत आणि २५ आमदारांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचे २५ आमदार अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालणार होते; पण त्यांची समजूत काढली गेली, असा दावा मंत्री दानवे यांनी जालन्यात केला होता