“मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त, युपी आणि बिहारसाठी लवकरच आणखी २ स्पेशल ट्रेन”
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 12:48 IST2021-08-06T12:47:54+5:302021-08-06T12:48:38+5:30
आता मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी लवकरच आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

“मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त, युपी आणि बिहारसाठी लवकरच आणखी २ स्पेशल ट्रेन”
नवी दिल्ली: कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदा भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा ठप्प झाली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर भारतीय रेल्वेकडून देशातील बहुतांश मार्गावरील आपली सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत भारतीय रेल्वेने मालवाहतुकीवर अधिक लक्ष केंद्रीत करून त्यातून मोठा महसूल कमावल्याचे सांगितले जात आहे. यातच आता मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी लवकरच आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. (raosaheb danve assured to start two more special trains from mumbai to uttar pradesh and bihar)
विसरभोळेपणाचा कळस! ५० वर्षांनंतर परत केले लायब्ररीचे पुस्तक; दंड ऐकून बसेल धक्का
भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी यासंदर्भात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मुंबई महानगर प्रदेशात पश्चिम भागात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्पेशल ट्रेन सुरु करण्याची मागणी संजय पाण्डेय यांनी केली होती. हा विषय रावसाहेब दानवेंनी पूर्णपणे ऐकला. उत्तर भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी लवकरच आणखी दोन नवीन विशेष ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे संजय पाण्डेय म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात, मोदी सरकारची हीच भूमिका; संजय राऊतांचे टीकास्त्र
बिहार आणि उत्तर प्रदेशात येणे सोयीचे होईल
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि MMR क्षेत्राच्या पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांची मोठी संख्या लक्षात घेऊन, वांद्रे टर्मिनस मुंबई ते वाराणसी, प्रयागराज आणि मुजफ्फरपूर, दरभंगा मार्गे वसई जंक्शन मार्गे २ नवीन ट्रेन सुरु करण्याबाबत प्रस्ताव मांडला. ज्यामुळे पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना बिहार आणि उत्तर प्रदेशात येणे सोयीचे होईल आणि ट्रॅफिकचे देखील विकेंद्रीकरण होईल. वसई विरार येथे असलेल्या प्रवाशांना अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च करून कुर्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल, असे संजय पाण्डेय यांनी म्हटले आहे.
Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया
दरम्यान, ठाकरे सरकारने अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यावर, राज्य सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत आहे. राज्य सरकारने करोना स्थिती आटोक्यात आली आहे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.