अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; केले ‘हे’ भाकित!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:33 PM2021-08-17T12:33:01+5:302021-08-17T12:36:41+5:30

रेल्वेराज्यमंत्रीपदी रावसाहेब दानवे मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

raosaheb danve to be meet cm uddhav thackeray for mumbai ahmedabad bullet train | अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; केले ‘हे’ भाकित!

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी रावसाहेब दानवे घेणार उद्धव ठाकरेंची भेट; केले ‘हे’ भाकित!

Next
ठळक मुद्देकदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावीआमचे भेटायचे ठरले आहेदुसरीकडे दानवेंची महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका

नवी दिल्ली: गेल्या अनेकविध दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. यातच आता केंद्रीय रेल्वेराज्यमंत्रीपदी बढती मिळालेले रावसाहेब दानवे आता मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. (raosaheb danve to be meet cm uddhav thackeray for mumbai ahmedabad bullet train)

“राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार

रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात रावसाहेब दानवे यांनीच माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मला ८ दिवसांपूर्वी फोन केला. माझेही दोनदा बोलणे झाले आहे. मी त्यांना भेटायला जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी त्यांना भेटणार आहे. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावी. पण बोलल्यानंतर मला कळेल. आमचे भेटायचे ठरले आहे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. 

चिंतेत भर! राज्यात डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ७६ वर; लस घेऊनही १८ जणांना लागण

अमर, अकबर, अँथनीसारखी यांची तीन तोंडे तीन दिशेला

दुसरीकडे रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्यातील सरकार स्वत:हूनच पडेल, असे भाकित रावसाहेब दानवे यांनी वर्तवले आहे. हे तीन पक्षांचे सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारे सरकार आहे. अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडे आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही, असे दानवे यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

Adani ग्रुपचा आता राज्याच्या व्यापारी मार्गावरही ताबा; ‘या’ कंपनीशी १६८० कोटींचा व्यवहार

दरम्यान, सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढले, तर माणसांना पूर्ण वेळ बसावेच लागते. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू, असे दानवे म्हणाले. तसेच महाराष्ट्रात भाजपासोबत काडीमोड घेऊन शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत तीन पक्षांचे सरकार स्थापन केले. मात्र, सुरुवातीपासूनच राज्यात भाजपकडून सरकार कधी पडेल याचे मुहूर्त दिले जात आहेत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावू, सरकार आपोआपच पडेल, असं देखील भाजपाकडून सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: raosaheb danve to be meet cm uddhav thackeray for mumbai ahmedabad bullet train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.