बलात्काराच्या आरोपीची होणार८४ व्या वर्षी ‘डीएनए’ चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:47 PM2020-07-19T22:47:46+5:302020-07-19T22:47:54+5:30
‘लॉकडाऊन’ सुरू असताना जयंत याने कोलकाता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
नवी दिल्ली : एका अल्पवयीन, अविवाहित मुलीच्या पोटी दोन आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या कन्यारत्नाचा खरा ‘पिता’ कोण हे निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका ८४ वर्षांच्या वृद्धाची ‘डीएनए’ चाचणी करण्याचा आदेश दिला आहे.
चाचणीसाठी या वृद्धाच्या रक्ताचा नमुना याआधीच घेण्यात आला आहे, असे पोलिसांनी कळविल्यावर न्या. अशोक भूषण, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने तीन आठवड्यांनी होणाऱ्या पुढील सुनावणीच्या वेळी या ‘डीएनए’ चाचणीचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
‘लॉकडाऊन’ सुरू असताना जयंत याने कोलकाता उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. जयंत एवढे वृद्ध आहेत की बलात्कारासारखी कृती करण्याची त्यांची शारीरिक क्षमताही नाही, असा मुद्दा त्याच्या वकिलाने मांडला. बलात्कार जयंतनेच केला यास वैद्यकीय पुरावा आहे, असे पब्लिक प्रॉसिक्युटरने सांगितले. त्यामुळे न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.
यानंतर आठवडाभरात जयंतने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. जयंतची पौरुषत्व, शुक्राणू अथवा ‘डीएनए’ चाचणी केली असल्यास त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश पहिल्या तारखेला झाला. त्यानंतर ७ जुलै या पुढील तारखेस सुनावणी होण्याआधी ५ जुलै रोजी फिर्यादी मुलगी प्रसूत होऊन तिला कन्यारत्न झाले. न्यायालयाने जयंतचे वैद्यकीय अहवाल पुन्हा मागवले.
९ जुलै रोजी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जयंतसाठी उभे राहिले. निर्दोषित्व सिद्ध करण्यासाठी आपला अशील ‘डीएनए’ चाचणी करून घेण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. ‘डीएनए’ चाचणीसाठी जयंतच्या रक्ताचे नमुने आधीच घेण्यात आले आहेत, असे प. बंगाल सरकारच्या वकिलाने सांगितले. त्यामुळे न्यायालयाने ‘डीएनए’ चाचणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. आता आरोप करणारी अल्पवयीन मुलगी आणि वयोवद्ध आरोपी यापैकी खरे कोण आणि खोटे कोण, याचा फैसला ५ आॅगस्ट रोजी होणे अपेक्षित आहे.
काय आहे प्रकरण?
च्या वृद्धाचे नाव जयंत चटर्जी असे असून तो प. बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील मातीगरा येथील रहिवासी आहे. ज्या अल्पवयीन मुलीला गेल्या ५ जुलै रोजी कन्यारत्न झाले तिने या वद्धावर बलात्काराचा आरोप केला आहे व आपल्याला झालेली मुलगी याच वद्धापासून झाली आहे, असा तिचा आरोप आहे.