बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर नराधमाने पुन्हा केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 11:14 AM2016-09-20T11:14:49+5:302016-09-20T11:18:17+5:30

बलात्काराच्या गुन्ह्यात चार वर्षांचा तुरूंगावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या नराधमाने पुन्हा एका चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली

Rape Against Narada again after being punished for raping her | बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर नराधमाने पुन्हा केला बलात्कार

बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर नराधमाने पुन्हा केला बलात्कार

Next

ऑनलाइन लोकमत

रामपूर, दि. २० - बलात्काराच्या गुन्ह्यात चार वर्षांचा तुरूंगावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या नराधमाने पुन्हा एका चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. बरेलीतील कामेरी तालुक्यात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय सलीम याने २०१२ साली एका आठ वर्षांचया चिमुकलीवर बलात्कार केला होता, त्या गुन्ह्यासाठी त्याला चार वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून अवघ्या काही दिवसांपूर्वी तुरूंगातून बाहेर आलेल्या सलीमने दुस-या इयत्तेत शिकणा-या बालिकेवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नव्हे तर अत्याचारानंतर तिचे हात व शीर कापून तिची हत्या केली. महत्वाचे म्हणजे या दुष्कृत्यात त्याच्या आई-वडिलांसह त्याचा चुलत भाऊ, जुनेदनेही त्याला साथ दिली. 
पोलिसांच्या सांगण्यानुसार, पीडित बालिका रविवारी संध्याकाळी वही खरेदी करण्यासाठी बाहेर पडली, मात्र ती घरी परतलीच नाही. त्यानंतर काही वेळाने पीडितेच्या आईने सलीम, त्याचे वडील व त्याच्या चुलत भावाला त्या मुलीच्या शरीराचे तुकडे प्लास्टिक बॅगेत भरताना पाहिले. गावक-यांना या घटनेची माहिती मिळताच संतप्त गावक-यांनी सलीमच्या घरात धाव घेतली असता त्याचे वडील कॉटवर बसले होते व त्यांच्या हातात पीडित बालिकेचा मृतदेह होता. याप्रकरणी पोलिसांनी सलीमच्या पालकांना अटक केली आहे, मात्र सलीम व त्याचा भाऊ अद्याप फरार आहेत.

Web Title: Rape Against Narada again after being punished for raping her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.