गुजरातमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार, उत्तर भारतीयावर संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 12:29 PM2018-10-16T12:29:47+5:302018-10-16T12:31:09+5:30
सुरतच्या या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसमवेत 15 दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे राहण्यास आला होता. पीडित मुलीचे वडिल रंगकाम करत असून ते
अहमदाबाद - गुजरातमधील साबरकांठा येथे एका 14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर, गुजरातमध्ये हिंसाचार उफाळला. तर, हजारो उत्तर भारतीयांना गुजरातमधून हाकलून लावण्यात आले. आता, आणखी एका असाच प्रकार उघडकीस आला आहे. सुरतमध्ये साडे-तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बलात्कार करणारा 20 वर्षीय तरुण उत्तर भारतीय असल्याचे समजते.
50 हजार यूपी, बिहारवाले गुजरातबाहेर; चिमुरडीवरील बलात्कारानंतर गुजरातींचा हिसका
सुरतच्या या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसमवेत 15 दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे राहण्यास आला होता. पीडित मुलीचे वडिल रंगकाम करत असून ते रोजंदारीवर काम करतात. पोलिसांना आरोपीची ओळख शोधण्यात यश आले असून सध्या त्याचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीचे नाव गुपित ठेवले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची गंभरीतेने दखल घेत, भाजपा खासदार सी.आर पाटिल यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून 4.5 लाख रुपयांचीही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, साबरकांठा येथील घटनेनंतर राज्यात उफाळलेल्या हिंसाचारामुळे या घटनेकडे गांभिर्याने पाहिले जात असून पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे.