लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

By admin | Published: September 22, 2016 01:16 AM2016-09-22T01:16:58+5:302016-09-22T01:16:58+5:30

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Rape by marriage bait | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

Next
्नाचे आमिष दाखवून बलात्कार
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाने आपल्या घटस्फोटित मामे बहिणीवर बलात्कार केला .
पीडितेचा घटस्फोट झाला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र त्याने लग्न करण्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

- डागा रुग्णालयात महिलेचा मृत्यू
नागपूर : डागा रुग्णालयात प्रसुतिसाठी भर्ती एका महिलेचा मृत्यू झाला. मोना प्रदीप घुमेकर (२५) रा. भांडेवाडी कळमना असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी तिचे सिझर ऑपरेशन झाले होते. परंतु बुधवारी पहाटे ४ वाजता तिची प्रकृती अचानक बिघडली. यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- ट्रकला धडकून मृत्यू
नागपूर : पतीसोबत बाईकने उपचारासाठी जात असलेल्या एका महिलेचा ट्रकला धडकून मृत्यू झाला. विजया पवन बिरहा (४०) सुरेंद्रगड असे मृताचे नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी तिची अचानक प्रकृती बिघडली. ती पतीसोबत बाईकवर उपचारासाठी जात होती. काटोल रोडवर फ्रेण्ड्स कॉलनीजवळ एका ट्रकला धडकल्याने तिच्या डोक्याला मार बसला. मेडिकलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हॉकर्सला हटवण्याच्या विरोध
नागपूर : ट्राफिक चिल्ड्रेन पार्कजवळील हॉकर्सला हटविण्यात येत असल्याच्या कारवाई विरोधात एका शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
भाजपाचे पदाधिकारी सुनील हिरणवार यांनी स्मार्तना पाटील यांना सांगितले की, या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या शेकडो कुटुंबाचे पालन पोषण केले जाते. पोलिसांच्या कारवाईमुळे रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. तेव्हा त्यांना पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत येथेच व्यवसाय करू द्यावा.
--------------------------

Web Title: Rape by marriage bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.