'निर्भया'वर उपचार करणा-या नर्सवर बलात्कार
By admin | Published: September 10, 2014 06:13 PM2014-09-10T18:13:24+5:302014-09-10T21:16:32+5:30
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणी 'निर्भया'वर उपचार करणा-या नर्सवरही सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - संपूर्ण देशाला हादरवणा-या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणी 'निर्भया'वर उपचार करणा-या नर्सवरही सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंजाबमधील बुढलाडा येथे ही घटना घडली.
पीडितेने नोंदवलेल्या जबाबानुसार, आरोपी पीडित नर्सच्या ओळखीचा आहे. तिला काही पैशांची गरज होती, याबद्दल तिने आरोपीला माहिती दिली असता, त्याने तिला पैसे घेण्यासाठी बुढलाडा येथे बोलावले. आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला व तिला पैसे दिले, त्यानंतर पीडित महिला परत जाण्यास निघाली असता आरोपी व त्या खोलीत उपस्थित असलेल्या इतर दोघांनी तिला पकडले व तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे, मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
२०१०२ साली दिल्लीत एका तरूणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता व तिला अमानुष मारहाणही करण्यात आली होती. या घटनेते गंभीर जखमी झालेली तरूणी 'निर्भया'वर दिल्लीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र अखेर तिचा मृत्यू झाला. या तरूणीवर ज्या नर्सने उपचार केले, तिच्यावरही बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.