‘त्या’ अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

By admin | Published: July 12, 2015 11:17 PM2015-07-12T23:17:15+5:302015-07-12T23:17:15+5:30

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ

The 'rape' of the officer | ‘त्या’ अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

‘त्या’ अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

Next

लखनौ : समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ठाकूर यांनी शुक्रवारी रात्री यादव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांच्या आतच त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा हा गुन्हा दाखल करण्यात आला, हे विशेष.
पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले ठाकूर यांच्याविरुद्ध पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार), ५०४ (हेतुपुरस्सर अवमान) आणि ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. गाझियाबादच्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीवरून ठाकूर यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गोमतीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख सईद मोहम्मद अब्बास यांनी दिली. ठाकूर यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या नूतन ठाकूर यांनाही या गुन्ह्यात सहआरोपी बनविण्यात आले आहे, असे अब्बास यांनी सांगितले.
नूतन या नोव्हेंबर २०१४ मध्ये गाझियाबादला गेल्या होत्या. तेथे त्यांनी तक्रारकर्त्या महिलेला नोकरीचे आश्वासन देऊन लखनौला आपल्या घरी बोलावून घेतले होते. ३१ डिसेंबर रोजी नूतन यांनी महिलेला ठाकूर यांच्या खोलीत मुलाखतीसाठी जाण्यास सांगितले आणि तेथे गेल्यावर ठाकूर यांनी आपल्यावर बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेने केली असल्याची माहिती अब्बास यांनी दिली. दरम्यान, हा एफआयआर निराधार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. आपण मुलायमसिंग यांनी दिलेल्या धमकीचा पर्दाफाश केला आणि सपाप्रमुखाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करून ही धमकी सार्वजनिक केली. त्याची मुलायमसिंग यांनी अशी ‘पतरफेड’ केली आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: The 'rape' of the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.