संतापजनक! न्यायालयात सुनावणीसाठी जाणाऱ्या बलात्कार पीडितेला जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 11:10 AM2019-12-05T11:10:24+5:302019-12-05T11:31:35+5:30
पीडितेची प्रकृती गंभीर; उपचार सुरू
उन्नाव: सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये घडली. स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना सकाळच्या सुमारास पाच तरुणांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांनी दिली. त्यानंतर पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेची प्रकृती अतिशय गंभीर असल्यानं त्यानंतर तिला लखनऊमध्ये हलवण्यात आलं.
बलात्कार पीडितेला जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला. आज सकाळी पीडित तरुणी बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी तिला जाळण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये पीडित तरुणी ६० ते ७० टक्के भाजली आहे. तिच्यावर सध्या लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
UP: A woman was set-ablaze in Bihar area of Unnao. Police say, "Victim referred to a hospital in Lucknow for better treatment. We have rounded up 3 accused, search for 2 others is underway. Victim had earlier filed a rape case, one accuse in that case has also been rounded up". pic.twitter.com/wDnXQjrPo9
— ANI UP (@ANINewsUP) December 5, 2019
आम्हाला सकाळी या घटनेची माहिती मिळाली. पीडितेनं आरोपींची नावं आम्हाला सांगितली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी विक्रांत विर यांनी दिली. आम्ही आरोपीच्या शोधासाठी पथकं तयार केली आहेत. पीडितेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं.
पीडितेनं मार्चमध्ये दोघांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. बलात्कार करुन त्याचं चित्रीकरण केल्याचा आरोप पीडितेनं दोघांवर केला होता. यातील एकाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला न्यायालयानं जामीन दिला. तर दुसरा आरोपी फरार होता. आज पीडितेला जाळण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी फरार आरोपीदेखील तिथे होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट जारी करुन त्याच्या संपत्तीवर आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.