योगा केल्यास बलात्कार घटतील - मुरली मनोहर जोशी

By admin | Published: February 23, 2015 10:18 AM2015-02-23T10:18:41+5:302015-02-23T10:23:51+5:30

प्रत्येकाने योगा केल्यास देशातील बलात्काराच्या घटना कमी होतील असे अजब तर्क भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मांडले आहे.

Rape will be reduced due to Yoga - Murli Manohar Joshi | योगा केल्यास बलात्कार घटतील - मुरली मनोहर जोशी

योगा केल्यास बलात्कार घटतील - मुरली मनोहर जोशी

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २३ - प्रत्येकाने योगा केल्यास देशातील बलात्काराच्या घटना कमी होतील असे अजब तर्क भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मांडले आहे. मुस्लिम दिवसातून पाच वेळा योगा करतात, तर मोहम्मद पैगंबर हे महान योगी होते असे जोशी यांनी म्हटले आहे. 

भाजपा नेते मुरली मनोहर जोशी हे नुकतेच एका योगाविषयक कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात मुरली मनोहर जोशी यांनी योगासनाचे महत्त्व पटवून देण्याच्या नादात वादग्रस्त विधान केले. देशातील प्रत्येक नागरिकाने योगा करायला हवे. असे केल्यास बलात्काराच्या घटना संपतील असे म्हणता येणार नाही. मात्र या घटनांमध्ये घट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

योगामुळे पुरुष आणि महिलांमध्ये एक नवा विचार जन्माला येतो. मानवी शरीराविषयीच्या त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होईल, निसर्गाने मोठे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला शरीर दिले आहे असे  त्यांना वाटू लागेल असा दावाही मुरली मनोहर जोशी यांनी केला.  

मुसलमान नमाज करतात, त्यामध्ये दोन किंवा तीन मुद्रा असतात, यावरुन मोहम्मद पैगंबर हे महान योगी होते हे स्पष्ट होते असेही मुरली मनोहर जोशी यांनी सांगितले. सैन्य व पोलिस दलातील जवानांनाही योगप्रशिक्षण द्यायला हवे अशी गरजही त्यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: Rape will be reduced due to Yoga - Murli Manohar Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.