महिलेवर बलात्कार; २ अधिका-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:53 AM2018-02-21T02:53:45+5:302018-02-21T02:53:54+5:30
कर्मचारी महिलेवर (२८) बलात्कार केल्याच्या आरोपावरून खासगी कंपनीच्या २ वरिष्ठ कार्यकारी अधिकाºयांना १८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून
विशाखापट्टणम : कर्मचारी महिलेवर (२८) बलात्कार केल्याच्या आरोपावरून खासगी कंपनीच्या २ वरिष्ठ कार्यकारी अधिकाºयांना १८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून, त्यात दिलीप पिंटो (५५) या श्रीलंकेच्या नागरिकाचा समावेश आहे.
पिंटो हा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक असून, दुसºया वरिष्ठ कार्यकारी अधिकाºयाचे नाव मल्ला श्याम सुंदर (३०) आहे. ही माहिती पोलीस उपअधीक्षक (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शाखा) सी. विवेकानंद यांनी दिली. पीडित महिला झारखंडमधील आदिवासी असून, अच्युतपूरममध्ये असलेल्या पॅकेजिंग कंपनीत ती कनिष्ठ पातळीवर कामाला होती व मलकापूरममध्ये राहते. पिंटो व सुंदर यांनी गेल्या काही महिन्यांत तिच्यावर अनेक वेळा स्वतंत्रपणे लैंगिक अत्याचार केले, असे विवेकानंद म्हणाले.
नंतर या महिलेला बढती दिली गेली आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिला कामगिरी ‘असमाधानकारक’ असल्याच्या कारणावरून काढून टाकले. गेल्या महिन्यात पीडितेने पोलीस अधीक्षक राहुल देव शर्मा यांच्याकडे दिलेली तक्रार त्यांनी तपासासाठी विवेकानंद यांच्याकडे पाठविली. पिंटो व सुंदर यांनी या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले. दोन्ही आरोपींना बलात्कार व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली अटक केली.
तरुणीवर अत्याचार
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये २ पुरुषांनी तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात धातूची वस्तू घुसविली, असे पोलिसांनी सांगितले. दोघांनाही अटक झाली आहे. दक्षिण दिनाजपूरमधील खेड्यात ही पीडिता पुलाखाली आढळली. ती १८ तास बेशुद्धावस्थेत पडून होती व तिच्या गुप्तांगातून आतडे बाहेर पडत होते. तिच्यावर मालदा रुग्णालयात २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.