महिलेवर बलात्कार; पोलीस उपायुक्तावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:30 AM2018-09-21T04:30:08+5:302018-09-21T04:30:14+5:30
विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार, तिच्या मुलीचा विनयभंग आणि तिच्या मुलाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका पोलीस उपायुक्ताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
नवी दिल्ली : विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार, तिच्या मुलीचा विनयभंग आणि तिच्या मुलाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका पोलीस उपायुक्ताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रमेश दहिया असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
या महिलेचा पती गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्या निधनानंतर या पोलीस अधिकाºयाची तिच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत त्याने तिच्या घरी जाणे सुरू केले आणि नंतर तिला तुझ्याशी विवाह करतो, असेही सांगितले. नंतर त्याने त्या महिलेवर अनेकदा बलात्कार केला, असा तिचा आरोप आहे. मात्र, मुलाच्या सुरक्षिततेसाठी आपण गप्प बसलो, असे महिलेचे म्हणणे आहे.
या अधिकाºयाने आपल्या मुलीचा विनयभंग केला, असेही तिने जुलै महिन्यात पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या अधिकाºयाने आपल्या मुलाचेही अपहरण केले होते, असेही तिचे म्हणणे आहे. या महिलेला तीन मुले आहेत. तो ज्या सदर बाजार पोलीस ठाण्याचा प्रमुख होता, त्याच हद्दीत ती महिला राहत होती. त्यामुळे आपली तक्रार नोंदवली जाणार नाही, अशी तिला भीती होती. तसेच तक्रार करायला गेलो, तर आपल्याला व मुलांना त्रास होईल, असेही तिला वाटत
होते.
>नुकतीच मिळाली होती बढती
रमेश दहिया हा सदर बाजार पोलीस ठाण्याचा प्रमुख असताना हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. दहिया याला नुकतीच पोलीस उपायुक्त म्हणून बढती मिळाली आहे. त्याच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे.