भोपाळमध्ये टॅक्सीमध्ये महिलेवर बलात्कार
By Admin | Published: January 3, 2016 04:55 PM2016-01-03T16:55:53+5:302016-01-03T17:38:26+5:30
महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भोपाळ पोलिसांनी ओलाच्या कार चालकाला अटक केली आहे. २९ डिसेंबरला बलात्काराची ही घटना घडली.
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ३ - महिला प्रवाशावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भोपाळ पोलिसांनी ओलाच्या कार चालकाला अटक केली आहे. २९ डिसेंबरला बलात्काराची ही घटना घडली. पीडित २८ वर्षांची विवाहीत महिला असून, तिने एक जानेवारीला तक्रार दाखल केली.
आरोपी दीपक बामाने याने महिलेला कुठेही या घटनेची वाच्यता करु नको अशी धमकी दिली होती. २९ डिसेंबरला पीडित महिलेने तिच्या घराजवळून ओला टॅक्सी पकडली होती. बैरागड ते गांधी नगर रस्त्यावर निर्जन ठिकाणी दीपक बामानेने टॅक्सी थांबवली आणि त्याने महिलेवर बलात्कार केला. कुठे वाच्यता केली तर, जीवे मारण्याची धमकी त्याने महिलेला दिली होती.
पीडित महिला एका खासगी रुग्णालयात नोकरी करते. तीन दिवसानंतर महिलेने तिच्या पतीला या घटनेबद्दल सांगितल्यानंतर दोघांनी रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी बामानेला पोलिसांनी अटक केली.
बामाने पीडित महिलेच्या घराजवळ रहातो तो तिला ओळखत असावा असे पोलिसांनी सांगितले.