जयपूरमध्ये जपानी पर्यटक तरूणीवर गाइडनेच केला बलात्कार

By admin | Published: February 9, 2015 01:41 PM2015-02-09T13:41:47+5:302015-02-09T14:33:23+5:30

जयपूरमध्ये एका २० वर्षीय जपानी पर्यटक तरूणीवर गाइडनेच बलात्कार केल्याने भारत सरकारच्या 'अतिथी देवो भव' या मोहिमेला जोरदार धक्का बसला आहे.

Raped by Japanese tourists in Jaipur | जयपूरमध्ये जपानी पर्यटक तरूणीवर गाइडनेच केला बलात्कार

जयपूरमध्ये जपानी पर्यटक तरूणीवर गाइडनेच केला बलात्कार

Next
>ऑनलाइन लोकमत
जयपूर दि. ९ - जयपूरमध्ये एका २० वर्षीय जपानी पर्यटक तरूणीवर गाइडनेच बलात्कार केल्याने भारत सरकारच्या 'अतिथी देवो भव' या मोहिमेला जोरदार धक्का बसला आहे. 'पिंक सिटी' नावाने ओळखल्या जाणारे हे शहर फिरवून दाखवण्याच्या बहाण्याने त्या तरूणाने तिला बाईकवरून नेले आणि एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दुदू पोलिस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या नराधम आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पीडित तरूणी 'जलमहाल' बघण्यासाठी गेली असता तिची अनोळखी तरूणाशी भेट झाली. भाषेमुळे तिला शहर फिरण्यात अडचण येत होती, मात्र आरोपी तरूणाला इंग्रजीचे चांगले ज्ञान असल्याने ती त्याच्याशी सहज संवाद साधू शकली आणि त्यामुळे शहर फिरताना त्याची मदत होऊ शकेल असा विचार करून ती त्याच्यासोत बाईकवरून जाण्यास राजी झाली. जयपूरमधील काही स्थळे फिरून झाल्यानंतर तो तरूण तिला जयपूर- अजमेर महामार्गावरील दुदू गावाजवळील एका निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.
तरूणीने बचावर्थ आरडाओरडा केल्याने काही गावकरी तेथे पोचले, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला.
गावक-यांनी पीडित तरूणीला मदत करत पोलीस स्थानकात नेले आणि तिच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. तरूणीला आरोपीचे नाव नीट आठवत नाहीये, मात्र तो तरूण २३ ते २७ वर्षांचा असल्याचे तिने तक्रारीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित तरूणीकडून आरोपीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवून त्या आधारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही पोलिसांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Raped by Japanese tourists in Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.