IAS आधिकाऱ्याच्या 'रेपिस्तान' ट्विटवर बॉसचे 'लवलेटर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:20 AM2018-07-11T11:20:09+5:302018-07-11T11:40:31+5:30

त्यांच्याविरुद्ध विभागानं कारवाई सुरु केली आहे.

For "Rapistan" Tweet, Kashmir Bureaucrat Shah Faesal Faces Centre's Wrath | IAS आधिकाऱ्याच्या 'रेपिस्तान' ट्विटवर बॉसचे 'लवलेटर'

IAS आधिकाऱ्याच्या 'रेपिस्तान' ट्विटवर बॉसचे 'लवलेटर'

googlenewsNext

नवी दिल्ली - महिलांवरील वाढते आत्याचार आणि बलात्कार प्रकरणावर ट्विट करणे आयएएस आधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2010 बॅचचे आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्याविरुद्ध त्यांच्या विभागानं कारवाई सुरु केली आहे. शाह यांनी 22 एप्रिल रोजी रेपिस्तानवर एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी 'पितृसत्ताक पद्धती + लोकसंख्या + निरक्षरता + दारू + पॉर्न + तंत्रज्ञान+ अराजकता = रेपिस्तान' असं ट्विट शाह फैजल यांनी केले होते. या ट्विटमुळे त्यांच्या विभागानं कारवाई सुरु केली आहे. याबाबत फैजल यांना बॉसकडून मेलवर एक 'पत्र' मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी ते सोशल मीडियावर मिश्किलपणे ट्विट करत पोस्ट केले आहे.

काय केले ट्विट - 


'दक्षिण आशियात रेप कल्चर विरुद्ध माझ्या मिश्किल ट्विटवर माझ्या बॉसनं धाडलेलं हे लव्ह लेटर... लोकशाही व्यवस्थेत आपलं मत मांडण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणण्य़ाचा (ब्रिटिशांच्या) वसाहतकाळातील नियम असं संबोधत फैजल यांनी आपल्याला मिळालेल्या पत्राचे फोटो ट्वीटमध्ये पोस्ट केले आहेत.   

22 एप्रिल रोजी केलेले ट्विट


कोण आहेत फैजल - 
फैजल हे जम्मू-काश्मीर राज्याच्या वीज विकास निगम कॉर्पोरपेशनचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते सिव्हिल सर्व्हिस परिक्षेत टॉपर ठरणारे पहिले आणि एकमेव काश्मीरी आहेत. सध्या ते जम्मू - काश्मीर सरकारच्या सेवेतून सुट्टीवर आहेत... आणि फुलब्राईट स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेत गेलेले आहेत. 

Web Title: For "Rapistan" Tweet, Kashmir Bureaucrat Shah Faesal Faces Centre's Wrath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.