असामच्या काझीरंगा उद्याणात दिसले दुर्मिळ पांढरे हरीण, VIDEO पाहून तुम्हीही चकीत व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 03:06 PM2021-12-20T15:06:01+5:302021-12-20T15:08:38+5:30
IFS अधिकारी सुशांता नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या पांढऱ्या रंगाच्या हरीणाचे फोटो शेअर केले आहेत.
गुवाहाटी: तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या जातीचे हरीण पाहिले असतील. जगभरात हरणांच्या अनेक प्रजाती आढळतात. पण, तुम्ही कधी पांढऱ्या रंगाचे हरीण पाहिले आहे का? कदाचित असे हरीण पाहिले नसावे. हे पांढऱ्या रंगाचे हरीण आपल्या भारतात आढळतात. ईशान्य भारतातील असाम (Assam) राज्यात असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्याणात (Kaziranga National Park Assam) येथे हे दुर्मिळ पांढरे हरीण आढळतात. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी या हरणाचा फोटो शेअर केला आहे.
A rare white hog deer in Kaziranga National Park
— Susanta Nanda IFS (@susantananda3) June 17, 2021
🎥Jayanta Kumar Sarma pic.twitter.com/MS9v0vFFVA
असाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून एक दुर्मिळ चित्र समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी या उद्याणात दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे हरीण दिसले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्याणाच्या ट्विटरवर या पांढऱ्या हरीणाचा (White Hog Deer) व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ आणि या हरणाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
Albino hog deer at Kohora pic.twitter.com/wZUkqNzjmm
— Kaziranga National Park & Tiger Reserve (@kaziranga_) December 16, 2021
हे हरीण क्वचितच कोणाला दिसतात
लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला की खरच अशी हरणे आहेत का? काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे डीएफओ रमेश गोगोई यांनी सांगितले की, हे दुर्मिळ पांढरे हरीण आसाममध्ये नक्कीच सापडतील. गोगोई म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच असे हरीण पहिल्यांदा पाहण्यास मिळाले आहेत. हे हरीण याच जंगलात मोठ्या प्रमाणात आढळलात, पण ते जंगलातून क्वचितच बाहेर येतात.
रंग पूर्णपणे अनुवांशिक आहे
या हरणाचा पांढरा रंग पूर्णपणे अनुवांशिक आहे, जनुकातील बदलामुळे असे घडते. ही हरण इतर हरणांपेक्षा वेगळी प्रजाती नाही. फक्त एक-दोन प्रकारची हरणच अशी सापडतील. डीएफओ रमेश गोगोई यांच्या म्हणण्यानुसार, देशातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात एकूण 40,000 हॉग हरण आहेत. पण, फक्त एक किंवा दोन प्रकारचे दुर्मिळ पांढरे हॉग हरीण आढळतात.