कौतुकास्पद! हुंडा नको म्हणत नवरदेवाने परत केले 21 लाख; 1 रुपया आणि नारळ घेऊन केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 04:26 PM2024-03-15T16:26:59+5:302024-03-15T16:33:59+5:30

वराने वधूच्या बाजूने दिलेले 21 लाख रुपये सन्मानपूर्वक परत केले आणि फक्त एक रुपया आणि एक नारळ स्वीकारला. याबाबत परिसरात सकारात्मक चर्चा सुरू आहेत.

ras groom returned 21 lakh of dowry brought the bride to marriage with rs 1 more coconut | कौतुकास्पद! हुंडा नको म्हणत नवरदेवाने परत केले 21 लाख; 1 रुपया आणि नारळ घेऊन केलं लग्न

फोटो - hindi.news18

समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली हुंडा प्रथा बंद करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. वराने वधूच्या बाजूने दिलेले 21 लाख रुपये सन्मानपूर्वक परत केले आणि फक्त एक रुपया आणि एक नारळ स्वीकारला. याबाबत परिसरात सकारात्मक चर्चा सुरू आहेत. दौसा जिल्ह्यातील आरएएस अधिकारी सुरेंद्र मीणा सध्या महुआ नगरपालिकेत ईओ म्हणून कार्यरत आहेत. परिसरातील निठार गावात लग्न समारंभात मुलाच्या बाजूने एक रुपयाचा हुंडा आणि नारळ घेऊन हुंडामुक्तीचा संदेश दिला.

निठार गावातील रहिवासी जवान सिंह यांचा मुलगा सुरेंद्र मीना याचा विवाह चित्तौडगड येथील रहिवासी हीरा सिंह यांची मुलगी आशा हिच्यासोबत निश्चित झाला. लग्न विधी पूर्ण करण्यासाठी मुलीच्या बाजूचे लोक निठार गावात पोहोचले. यावेळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी लग्न समारंभासाठी वराला 21 लाख रुपये रोख दिले. त्यानंतर वराने हुंड्यात फक्त एक रुपया आणि एक नारळ स्वीकारला आणि 21 लाख रुपये परत केले आणि लग्नात हुंडा घेणार नसल्याचं सांगितलं. ज्याचं सर्वांनी कौतुक केलं.

या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती, प्रत्यक्षात हुंडा म्हणून एक रुपया आणि एक नारळ घेणारा नवरदेव सुरेंद्र मीणा सध्या महवा नगरपालिकेत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे, तर त्याची जोडीदार आशा ही नोकरी करत नाही. सुरेंद्र म्हणाले की, समाजात प्रचलित असलेल्या दुष्कृत्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण पुढे जाऊन पुढाकार घेतला पाहिजे. दुसरीकडे निठारसह आसपासच्या भागातील लोकही ते अनुकरणीय असल्याचं सांगत आहेत.

नवरदेवाचे वडील जवान सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, वधू हाच विवाहातील खरा हुंडा आहे आणि संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईक हे अंमलात आणण्यात आनंदी आहेत. या वेळी आमदार राजेंद्र मीणा, माजी मंत्री गोलमा देवी, माजी जिल्हाप्रमुख अजित सिंह यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी या विवाहसोहळ्यात उपस्थित होते.
 

Web Title: ras groom returned 21 lakh of dowry brought the bride to marriage with rs 1 more coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.