ईशान्येत सत्तेसाठी रस्सीखेच : दोन राज्यांत ‘मित्र’ सरकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:42 AM2018-03-05T06:42:46+5:302018-03-05T06:42:46+5:30

त्रिपुरात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर, नेता निवडीसाठी मंगळवारी भाजपा व आयपीएफटीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब देब यांनी दिली.

 Rashikachchh for power in North-East: 'Friends' government in two states! | ईशान्येत सत्तेसाठी रस्सीखेच : दोन राज्यांत ‘मित्र’ सरकार!

ईशान्येत सत्तेसाठी रस्सीखेच : दोन राज्यांत ‘मित्र’ सरकार!

Next

त्रिपुरा : भाजपाच्या नेता निवडीसाठी मंगळवारी बैठक; बिप्लव देव हेच प्रबळ दावेदार

आगरतळा : त्रिपुरात भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर, नेता निवडीसाठी मंगळवारी भाजपा व आयपीएफटीच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलविण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बिप्लब देब यांनी दिली. तथापि, भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्युएल ओराम यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. बिप्लव देव हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नव्या सरकारचा शपथविधी ८ मार्च रोजी होईल, अशी शक्यता आहे.
भाजपाचे ३५ आमदार निवडून आले असून, सहकारी पक्ष आयपीएफटीचे ८ सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान, मंगळवारी होणाºया बैठकीला नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल, असे देब यांनी सांगितले.

माणिक सरकार यांचा राजीनामा
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी रविवारी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे राजीनामा सोपविला. विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारीच
जाहीर झाले. भाजपाने डाव्या पक्षांची २५ वर्षांची सत्ता उलथून लावत येथे बहुमत मिळविले आहे. तथापि, नवे मुख्यमंत्री सत्तारूढ होईपर्यंत
त्यांना काम पाहण्यास सांगितले आहे.

मेघालय : भाजपाचा मित्रपक्ष एनपीपीच्या संगमा यांनी केला सरकार स्थापनेचा दावा

गंगटोक : ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या भाजपाच्या मित्रपक्षाचे नेते कॉन्राड संगमा यांनी मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची रविवारी भेट घेऊन ३४ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
या आधी मेघालय विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर, मुकुल संगमा यांनीही राज्यपालांना भेटून सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेसाठी आपल्याला आधी संधी द्यावी, अशी विनंती केली. ५९ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे २१ तर ‘एनपीपी’चे १९ सदस्य निवडून आले आहेत.
काँग्रेस वगळून अन्य सर्व पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असा दावा कॉन्राड संगमा यांनी केला.

आज चित्र
स्पष्ट होईल
राज्यपालांनी
अद्याप कोणालाही सरकार स्थापनेसाठी पाचारण केले
नसले, तरी उद्या सोमवारपर्यंत
चित्र स्पष्ट होईल
व नव्या सरकारचा शपथविधी मंगळवारी ६
मार्च रोजी होईल, असे समजते.

नागालँड : एनडीपीपीचे रियो यांचा सत्ता स्थापन्याचा दावा, भाजपासह अन्य पक्ष सोबत

कोहिमा : नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगे्रसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे. रियो यांच्याकडे बहुमत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे, असे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी म्हटले असले, तरी रियो यांनी सोमवारपर्यंत ३२ आमदारांच्या समर्थनाचे पत्र स्वाक्षºयांसह सादर करावे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि महासचिव अरुण सिंह हे नागालँडमध्ये पक्षाचे केंद्रीय निरीक्षक आहेत. जेडीयूचे एकमेव आमदार जी. कैटो अये आणि अपक्ष आमदार टोंगपांग ओजुकुम यांनी रियो यांच्या आघाडीला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती एनडीपीपीचे महासचिव अबू मेथा यांनी दिली.

राज्यपालांची घेतली भेट
नेफ्यू रियो यांनी
रविवारी राज्यपाल
पी. बी. आचार्य यांची
भेट घेतली आणि आपल्याकडे बहुमत आहे, असा दावा केला. रिओ हे राज्यात ३ वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नागालँडमधील ६० सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला १८, तर सहकारी पक्ष भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत.

Web Title:  Rashikachchh for power in North-East: 'Friends' government in two states!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.