मंत्रिपदासाठी गुजरातेत रस्सीखेच; भाजपा आमदारांच्या वाढल्या मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:31 PM2018-01-06T23:31:45+5:302018-01-06T23:32:01+5:30

गुजरातमध्ये काठावरील बहुमत मिळाल्याने भाजपा सरकारला स्वपक्षीयांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त करून अर्थ खाते मिळवले.

Rashikchhit in Gujarat for the minister; Increased demands of BJP MLAs | मंत्रिपदासाठी गुजरातेत रस्सीखेच; भाजपा आमदारांच्या वाढल्या मागण्या

मंत्रिपदासाठी गुजरातेत रस्सीखेच; भाजपा आमदारांच्या वाढल्या मागण्या

Next

गांधीनगर : गुजरातमध्ये काठावरील बहुमत मिळाल्याने भाजपा सरकारला स्वपक्षीयांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी नाराजी स्पष्टपणे व्यक्त करून अर्थ खाते मिळवले. त्यानंतर पुरुषोत्तम सोळंकी यांनी आपणास ‘चांगले’ खाते द्या, असा आग्रह मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याकडे धरला आहे, तर जेठा भरवाड यांची वर्णी न लागल्याने त्यांच्या समर्थकांनी जाहीरपणे बंडाची भाषा सुरू केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीस उपस्थित न राहून सोळंकी यांनी नाराजी दाखवून दिली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी चांगले खाते देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा सोळंकी यांनी केला. सोळंकी यांना चांगले खाते मिळावे, यासाठी त्यांच्या समर्थकांनी माजी आमदार हिरा सोळंकी यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. हिरा सोळंकी हे पुरुषोत्तम सोळंकी यांचे बंधू आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच सोळंकी यांनी कोळी समाजावर अन्याय झाल्याची भाषा सुरू केली होती. कोळी समाजाने भाजपाला मते दिली, तरीही भाजपा मात्र समाजावर अन्याय करीत आहे, असे म्हणत, मुख्यमंत्र्यांनी तब्बल १२ खाती स्वत:कडे ठेवल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री विजय रूपाणी त्यांच्यासह
कोळी समाजाच्या नेत्यांची समजूत काढली. (वृत्तसंस्था)

नाराज की समाधानी?
जेठा भरवाड सलग पाचव्यांदा भाजपातर्फे निवडून आले आहेत. त्यांना मंत्री करण्यात यावे, अशी मागणी समर्थक करीत आहेत. त्यांना मंत्री न केल्याने न समर्थकांनी संताप व्यक्त केला. जेठा भरवाड मात्र, आपण आमदार म्हणून आनंदात आहोत, मंत्रीपद हवे, अशी आपली मागणी नाही, असे सांगत आहेत. काही समर्थक आपणास मंत्री करण्याची मागणी करीत असल्याचे कालच समजले. त्यांना मी समजावले आहे, असेही ते म्हणाले.

पुरुषोत्तम सोळंकी यांनी कोळी समाजावर अन्याय झाल्याची भाषा सुरू केली. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी स्वत:कडे तब्बल १२ खाती ठेवल्याबद्दलही सोळंकी यांनी संताप व्यक्त केला होता.

Web Title: Rashikchhit in Gujarat for the minister; Increased demands of BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.