राष्ट्रपती भवन बनले आता स्मार्ट

By admin | Published: May 21, 2016 04:17 AM2016-05-21T04:17:19+5:302016-05-21T04:17:19+5:30

राजधानी दिल्लीतील सगळ्यात मोठी निवासी वास्तू राष्ट्रपती भवन आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने स्मार्ट बनले आहे.

Rashtrapati Bhavan became now smart | राष्ट्रपती भवन बनले आता स्मार्ट

राष्ट्रपती भवन बनले आता स्मार्ट

Next


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सगळ्यात मोठी निवासी वास्तू राष्ट्रपती भवन आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने स्मार्ट बनले आहे. ३३० एकरमध्ये विस्तारलेल्या राष्ट्रपती भवनातील पाणी, ऊर्जा, कचरा आणि सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची तंत्रज्ञान कंपनी आयबीएमने बनविलेले इंटेलिजन्ट आॅपरेशन सेंटर आणि मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे उद््घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी झाले. जगात आता राष्ट्रपती भवन स्मार्ट टेस्ट झाल्याचा दावा करू शकते.
राष्ट्रपती भवनला ज्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल ते हे इंटेलिजन्ट आॅपरेशन सेंटर २४ तास कार्यरत राहून सोडवणार आहे. यामुळे म्हैसूर कॅम्पस आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी आणि आयआयटी हैदराबाद या स्मार्ट टाऊनशिपमध्ये आता राष्ट्रपती भवनचा दिमाखाने समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटीज् कार्यक्रमानुसार शहरांतील रहिवाशांना जास्तीतजास्त चांगले पर्यावरण उपलब्ध करून देणे, वाहतूक, दर्जेदार जीवनमान आणि उत्तम प्रशासन देण्याचा प्रयत्न आहे.
या प्रकल्पावर आयबीएमने वर्षभरापूर्वी काम सुरू केले होते. रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी डिजिटल सोल्युशन्स देण्यासाठी आमचा प्रयत्न होता व त्यासाठीची ही भागीदारी उत्तम होती, असे आयबीएमच्या प्रवक्त्याने सांगितले.
या वास्तूचा कायापालट करण्याची कल्पना माझ्यासमोर पहिल्यांदा अंतर्गत तुकडीने मांडली त्या वेळी ही वसाहत ‘ए थ्रीएच’ : ह्युमन (मानव), हायटेक (उच्च तंत्रज्ञान) आणि हेरिटेज (वारसा) स्वरूपाची असावी, असे मला हवे होते. आमचे स्मार्ट राष्ट्रपती भवन चार एचभोवती काम करील व चौथे एच म्हणजे सुख, समाधान, असेही मुखर्जी म्हणाले.
>सहा हजार रहिवाशांचे छोटे शहरच
राष्ट्रपती भवन हे इतर शहरांसारखे शहर नसले तरी ते शहरांपेक्षा वेगळेही नाही. मी राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतली त्या वेळी हे भव्य, दिमाखदार राष्ट्रपती भवन तब्बल सहा हजार रहिवाशांचे छोटे शहरच आहे याची मला कल्पना नव्हती. हे शहर म्हणजे भारताची प्रतिकृतीच आहे. येथील रहिवासी वेगवेगळ्या धर्माचे, धार्मिक श्रद्धांचे व विविध, वेगवेगळे रीतीरिवाज जोपासणारे आहेत, असे प्रणव मुखर्जी उद््घाटनाच्या भाषणात म्हणाले.

Web Title: Rashtrapati Bhavan became now smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.