Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा, मात्र बहुमतापर्यंत मजल नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 01:26 AM2020-11-11T01:26:03+5:302020-11-11T06:58:32+5:30

नितीश यांचे पद डळमळीत

Rashtriy Lokshahi Aghadi again in Bihar; Tejaswi has the most seats, but not the majority | Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा, मात्र बहुमतापर्यंत मजल नाही

Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये पुन्हा रालोआच; तेजस्वी यांना सर्वाधिक जागा, मात्र बहुमतापर्यंत मजल नाही

Next

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांना बहुमत मिळणार नाही, हे एक्झिट पोलचे अंदाज मतदारांनी धुळीस मिळविले असून, या आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पण भाजपला संयुक्त जनता दलापेक्षा अधिक जागा मिळाल्याने नितीश पुन्हा मुख्यमंत्री होतील का, हा प्रश्न आहे. दुसरीकडे सर्वाधिक जागा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने मिळविल्या असून, आमचेच सरकार येणार आणि बिहारमध्ये सत्तांतर होणार, असे राजदचे नेते ठामपणे सांगत आहेत. 

रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू असून रालोआ व महाआघाडी यांच्यात १० जागांचाच फरक आहे. रालोआला १२२ ते १२६ जागांवर पुढे असून, महाआघाडी ११० ते ११५ जागी आघाडीवर आहे. हाच कल कायमच राहिल्यास रालोआचे सरकार येण्यात अडचणी येणार नाहीत. पण हे कल बदलतील, असा राजदचा दावा आहे. 

नितीश कुमार यांची लोकप्रियता ओहोटीला

रालोआ आणि तेजस्वी यादव व काँग्रेस यांच्या महाआघाडीमध्ये दिवसभर चुरस कायम राहिली. रात्री उशिरापर्यंत कधी या तर कधी त्याला आघाडीच्या जागा मागेपुढे होत होत्या. पण या निकालांनी एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे नितीश कुमार यांची लोकप्रियता ओहोटीला लागली आहे.  

नितीश कुमार । जदयु
नितीशकुमार यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपली ही अखेरची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक आवाहन केले. त्यामुळे मतांचा लंबक जदयुकडे वळला.

तेजस्वी यादव । राजद
तेजस्वी यादव यांनी मोठ्या तडफेने विधानसभा निवडणूक लढवली. त्यांच्या झंझावातामुळे नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचाराचा वेग वाढवावा लागला. 

चिराग पासवान । लाेजपा
भाजपची ‘बी टीम’ ठरलेल्या लोक जनशक्ती पार्टीने जदयुविरोधात उमेदवार उभे केले नसते तर जदयु सर्वात मोठा पक्ष ठरला असता.

पाेटनिवडणुकीत भाजपची सरशी

भोपाळ, लखनऊ, अहमदाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच मध्य प्रदेश आणि गुजरातसह ११ राज्यांत ५९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांबाबतही देशभरात उत्सुकता निर्माण झाली होती. या पोटनिवडणुकांत ४० हून अधिक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपने नऊहून अधिक जागांवर विजय मिळवत राज्यातील सत्ता अधिक मजबूत केली आहे. 

उत्तर प्रदेशात ७ पैकी ६ जागा जिंकल्या

मध्य प्रदेशात २८ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने नऊ जागांवर विजय मिळवला तर अन्य १० जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. गुजरातमध्ये आठपैकी आठ जागांवर भाजपने विजय  मिळवला. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश सातपैकी सहा जागा भाजपला जिंकता आल्या.  इतर राज्यांत मणिपूर (५ जागा), हरियाणा (१), छत्तीसगड (१), झारखंड (२), कर्नाटक (२), नागालॅॅण्ड (२), ओडिशा (२) आणि तेलंगणा (१) इत्यादी जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांपैकी काँग्रेसला हरयाणातील एका जागेवर विजय मिळवता आला. 

Web Title: Rashtriy Lokshahi Aghadi again in Bihar; Tejaswi has the most seats, but not the majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.