तेजस्वी यादव राजदचे विधानसभेतील पक्षनेते
By admin | Published: December 1, 2015 02:38 AM2015-12-01T02:38:07+5:302015-12-01T02:38:07+5:30
लालूप्रसाद यादव यांचे पुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यांची राजदच्या विधानसभेतील नेतेपदी, तर पत्नी राबडीदेवी यांची राजदच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
पाटणा : लालूप्रसाद यादव यांचे पुत्र उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यांची राजदच्या विधानसभेतील नेतेपदी, तर पत्नी राबडीदेवी यांची राजदच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी ही घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाचे खुले प्रदर्शन या शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.
नेतानिवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना बहाल करण्याचा निर्णय आमदारांनी घेतल्यानंतर ही औपचारिकता पार पाडण्यात आली. राबडीदेवी या विधान परिषदेच्या सदस्य आहेत. वैशाली जिल्ह्यातील राघोपूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांना लालूप्रसाद यांनी उत्तराधिकारी बनविल्याचे मानले जाते. आमच्या कामगिरीत काही चूक असेल तर भाजपला टीका करण्याचा अधिकार आहे, असे सांगत तेजस्वी यादव यांनी भाजपला उत्तर दिले. (वृत्तसंस्था)