Ratan Tata यांना 'या' गोष्टीत सर्वाधिक आनंद मिळतो, पाहा Video..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 07:17 PM2022-12-28T19:17:53+5:302022-12-28T19:18:25+5:30

दिग्गज उद्योगपती रतन टाटा त्यांच्या मृदू स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

Ratan Tata Birthday: Ratan Tata enjoys this thing the most, watch the video..! | Ratan Tata यांना 'या' गोष्टीत सर्वाधिक आनंद मिळतो, पाहा Video..!

Ratan Tata यांना 'या' गोष्टीत सर्वाधिक आनंद मिळतो, पाहा Video..!

googlenewsNext

Ratan Tata Birthday: दिग्गज उद्योगपती आणि टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) त्यांच्या मृदू स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. स्वभावासोबतच ते आपल्या प्रेरणादायी भाषणांमुळेही अनेकदाचर्चेत येतात. नुकतीच त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटांना आनंद कधी मिळतो, याबाबत ते व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.

RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर हँडलवर रतन टाटांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओत टाटा म्हणतात, "अनेकजण म्हणतात की, ही अमुक गोष्ट करू शकत नाही. पण, मला प्रयत्न करण्यात खूप आनंद मिळतो." टाटांची प्रेरणादायी भाषणे अनेकदा मने जिंकतात. आता या व्हिडिओनेही नेटकऱ्यांची मने जिंकली.

युजर्सच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, "ऑटोमोबाईल उद्योगाने एक लाख रुपयांमध्ये प्रवासी कार तयार करणे अशक्य होते, पण रतन टाटांनी ते करुन दाखवले. दरम्यान, एक मोठे उद्योगपती असण्यासोबतच रतन टाटा एक गुंतवणूकदारदेखील आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकांच्या लहान-लहान स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, कारदेखो, स्नॅपडील, क्युरफिट, जिवामे, अर्बन कंपनी, लेन्सकार्ट, यासह अनेक कपन्यांना टाटांची मदत लाभली आहे.

Web Title: Ratan Tata Birthday: Ratan Tata enjoys this thing the most, watch the video..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.