ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 08:45 PM2020-06-21T20:45:29+5:302020-06-21T20:48:32+5:30

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे.

Ratan Tata calls for stopping online hate, bullying | ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

ऑनलाईन द्वेष, गुंडगिरी यावर आळा घाला - रतन टाटा

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत आहे आणि एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांनी रविवारी ऑनलाईन द्वेष आणि गुंडगिरी थांबविण्याचे आवाहन केले आहे. याऐवजी सर्वांनी एकमेकांना समर्थन दिले पाहिजे, कारण हे वर्ष आव्हानांनी भरलेले आहे, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत आहे आणि एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.

"हे वर्ष कोणत्या-ना-कोणत्या स्तरावर प्रत्येकासाठी आव्हानांनी भरलेले आहे. ऑनलाइन समुदाय एकमेकांसाठी हानिकारक होत असल्याचे दिसून येत आहे. लोक लगेच प्रतिक्रिया देऊन एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत," असे रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. याचबरोबर, रतन टाटा म्हणाले, "माझे मते, यावर्षी विशेषत: आपण सर्वांनी ऐक्य आणि मदत करणे आवश्यक आहे आणि एकमेकांना कमी लेखण्याची ही वेळ नाही."

याशिवाय, एकमेकांच्या प्रति अधिक संवेदनशीलतेचा आग्रह करत अधिक दयाळूपणा, अधिक समज आणि धैर्याची आवश्यकता असल्याचे रतन टाटा यांनी पुन्हा एकदा सांगितले. ते म्हणाले, "माझी ऑनलाइन उपस्थिती मर्यादित आहे, परंतु मला आशा आहे की, हे प्रामाणिकपणाचे स्थान म्हणून विकसित होईल आणि द्वेष आणि गुंडगिरीऐवजी याठिकाणी प्रत्येकाला समर्थन मिळेल."

आणखी बातम्या...

"आम्ही चीनला धडा शिकवण्यासाठी अन् शहीद जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जातोय"

धक्कादायक! पतीकडून पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, परिसरात खळबळ

Google मुळे 40 वर्षांनंतर 93 वर्षीय आजी आपल्या कुटुंबीयांना भेटली!

राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'

नवी मुंबईत 12 इंच व्यासाच्या खगोलशास्त्रीय दुर्बिणीमधून पाहिले सूर्यग्रहण

दारूच्या नशेत तरूणाकडून आपल्या सहकाऱ्याची हत्या

Web Title: Ratan Tata calls for stopping online hate, bullying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.