रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 05:53 AM2024-10-11T05:53:59+5:302024-10-11T05:53:59+5:30

जॅग्युआर लॅंड राेव्हर तसेच एअर इंडियाचे अधिग्रहण असाे, कार उत्पादन, दूरसंचार प्रवेश करणे, हे रतन टाटा यांचे निर्णय ऐतिहासिक ठरले.

ratan tata game changing bold decisions takeover of jaguar land rover to air india | रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी

रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेली कंपनी यशाच्या उत्तुंग शिखरावर नेण्यामध्ये रतन टाटा यांनी घेतलेले धडाडीचे व तेवढेच धाडसी निर्णय महत्त्वपूर्ण ठरले. जॅग्युआर लॅंड राेव्हर तसेच एअर इंडियाचे अधिग्रहण असाे, कार उत्पादन, दूरसंचार प्रवेश करणे, हे त्यांचे निर्णय ऐतिहासिक ठरले.

‘जेएलआर’चे अधिग्रहण

रतन टाटा यांच्याच नेतृत्त्वात लग्झरी कार उत्पादक कंपनी जॅग्युआर लॅंड राेव्हरच (जेएलआर) अधिग्रहण केले हाेते. या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २.६ अब्ज पाैंड एवढा लाभांश दिला.

प्रवासी कार व्यवसायात प्रवेश

इंडिका ही कार लाॅंच करून रतन टाटा यांनी कार व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी सर्वसामान्यांसाठी एक लाख रुपयांची टाटा नॅनाे ही कार लाॅंच केली.

दूरसंचार क्षेत्रात भागीदारी

२००८मध्ये जपानची एनटीटी डाेकाेमाे या कंपनीसाेबत भागीदारीने टाटा डाेकाेमाे ही जीएसएम माेबाईल सेवा देणारी कंपनी सुरू केली. ३ जी सेवा सुरू करणारी ही पहिली कंपनी ठरली हाेती.

संरक्षण क्षेत्रात ठेवले पाऊल

टाटा ॲडव्हास्ड सिस्टीम लिमिटेड ही कंपनी २००७मध्ये सुरू केली. अंतराळ व संरक्षण क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. कंपनीने लाॅकहीड मार्टिन ही कंपनी भागीदारी करणार आहे.

एअर इंडियाची घरवापसी

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीची टाटा समूहात २०२१ मध्ये घरवापसी झाली. टाटा समूहानेच या कंपनीची स्थापना देशाच्या स्वातंत्र्यानंतर केली हाेती. 

पाेस्टाचे रतन टाटांवर विशेष कव्हर

पाटणा : रतन टाटा यांना मानवंदना म्हणून पोस्टाच्या बिहार सर्कलने गुरुवारी त्यांच्यावर विशेष कव्हर जारी केले. बिहार सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अनिलकुमार यांच्या हस्ते विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले. अनिलकुमार यांनी सांगितले की, हे विशेष कव्हर केवळ रतन टाटा यांना श्रद्धांजलीच नसून त्यांच्या कार्याची आठवणही आपल्याला करून देणार आहे.

 

Web Title: ratan tata game changing bold decisions takeover of jaguar land rover to air india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.