Ration Card : रेशन कार्डसंबंधित समस्या आहे? मग 'या' क्रमांकावर करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 07:08 PM2021-03-09T19:08:37+5:302021-03-09T19:27:53+5:30

Ration Card : समस्यांचा सामना करावा लागत असल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. 

ration card complaint helpline number state wise details | Ration Card : रेशन कार्डसंबंधित समस्या आहे? मग 'या' क्रमांकावर करा तक्रार

Ration Card : रेशन कार्डसंबंधित समस्या आहे? मग 'या' क्रमांकावर करा तक्रार

googlenewsNext

नवी दिल्ली - रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याद्वारे नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवलं जातं. मात्र अनेकदा रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करत असल्याचं दिसून येतं. काही वेळा हे धान्य ज्यादा दराने अन्य दुकानदारांना विकलं जातं. अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते. 

NFSA वेबसाईटवर करा तक्रार 

नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवर (NFSA) प्रत्येक राज्यासाठी (State) वेगवेगळे टोल फ्री क्रमांक (Toll Free Number) देण्यात आले आहेत. यावर किंवा एनएफएसएच्या वेबसाईटवर https://nfsa.gov.inतक्रार करता येईल. या ई मेल किंवा फोन क्रमांकाच्या आधारे तक्रार नोंदवता येते. प्रत्येक राज्यात रेशन कार्ड बनविण्याची पद्धतही वेगळी आहे. गरीब नागरिकांना अनुदानित (Subsidy) किमतीत धान्य मिळावं, रेशन दुकान व्यवस्थेतील समस्या दूर व्हाव्या यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. 

राज्यनिहाय टोल फ्री क्रमांक जाणून घेऊया...

आंध्रप्रदेश - 1800-425-2977
अरुणाचल प्रदेश - 03602244290
आसाम - 1800-345-3611
बिहार - 1800-3456-194
छ्त्तीसगड - 1800-233-3663
गोवा - 1800-233-0022
गुजरात - 1800-233-5500
हरियाणा - 1800–180–2087
हिमाचल प्रदेश - 1800–180–8026
झारखंड - 1800-345-6598, 1800-212-5512
कर्नाटक- 1800-425-9339
केरळ- 1800-425-1550
मध्यप्रदेश - 181
महाराष्ट्र - 1800-22-4950
मणिपूर - 1800-345-3821
मेघालय - 1800-345-3670
मिझोरम - 1860-222-222-789, 1800-345-3891
नागालँड - 1800-345-3704, 1800-345-3705
ओड़िशा - 1800-345-6724 / 6760
पंजाब - 1800-3006-1313
राजस्थान - 1800-180-6127
सिक्किम - 1800-345-3236
तामिळनाडू - 1800-425-5901
तेलंगाणा - 1800-4250-0333
त्रिपुरा - 1800-345-3665
उत्तरप्रदेश - 1800-180-0150
उत्तराखंड - 1800-180-2000, 1800-180-4188
पश्चिम बंगाल - 1800-345-5505
दिल्ली - 1800-110-841
जम्मू - 1800-180-7106
काश्मीर - 1800–180–7011
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह - 1800-343-3197
चंदीगड - 1800–180–2068
दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव - 1800-233-4004
लक्षद्वीप - 1800-425-3186
पुदुच्चेरी - 1800-425-1082

Web Title: ration card complaint helpline number state wise details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत