Ration Card : कोट्यवधी रेशन कार्डधारकांना झटका; पुढच्या महिन्यापासून बंद होणार मोफत धान्याची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 04:32 PM2022-08-22T16:32:52+5:302022-08-22T17:11:45+5:30
Ration Card : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत तांदूळ मिळत राहणार आहे.
नवी दिल्ली - तुम्हीही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन अपडेट अंतर्गत आता रेशन कार्डधारकांना धान्याची किंमत मोजावी लागणार आहे. यूपी सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, सप्टेंबरपासून रेशन कार्डधारकांना मिळणार मोफत धान्य बंद होणार आहे. पण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत तांदूळ मिळत राहणार आहे.
2020 कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी, प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना (PMGKY) अंतर्गत रेशन कार्डधारकांसाठी नियमित रेशन व्यतिरिक्त मोफत 5 किलो गहू-तांदूळ वितरण सुरू करण्यात आले. यानंतर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून नियमित वाटप करण्यात येणारे रेशनही मोफत करण्यात आले.
शिधावाटप दोन महिने उशिराने सुरू
यूपीच्या योगी सरकारकडून जून 2020 पर्यंत मोफत रेशन वाटपाच्या सूचना होत्या. त्यानुसार जुलैपासून रेशन कार्डधारकांना नियमित धान्याच्या बदल्यात पैसे भरावे लागले. या अंतर्गत गहू 2 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने मोजावे लागले. मात्र सध्या रेशन वितरणाचे वेळापत्रक दोन महिने उशिराने सुरू आहे. अशा परिस्थितीत जून ते ऑगस्टपर्यंत मोफत रेशन मिळत आहे.
केंद्राकडून सप्टेंबरपर्यंत मोफत रेशन मिळेल
अशा स्थितीत रेशन कार्डधारकांना सप्टेंबरपासून रेशनच्या बदल्यात पैसे द्यावे लागणार आहेत. सध्या प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजनेंतर्गत पाच किलो तांदूळाचे वितरण सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने सप्टेंबरपर्यंत मोफत रेशन वाटपासाठी या योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची चर्चा केली होती. त्यानुसार ऑक्टोबरपासून शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.