Fact Check : बापरे! 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर रेशन कार्ड होणार रद्द? जाणून घ्या "सत्य"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 01:25 PM2020-12-19T13:25:09+5:302021-01-27T14:11:38+5:30
Ration Card Fact Check : रेशन कार्ड बातम्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर असंख्य मेसेज हे सातत्याने व्हायरल होत असतात. अनेकदा त्यातील सर्वच मेसेज हे खरे असतात असं नाहीच तर काही मेसेज हे अफवा पसरवणारे, फेक असतात. अशावेळी असे खोटे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं अत्यंत गरजेचं आहे. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर कार्ड रद्द होणार असल्याचं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
रेशन कार्ड रद्द होणार याबाबत अधिक माहिती घेतली असता हा मेसेज खोटा असल्याची माहिती आता समोर आली आहे. रेशन कार्ड बातम्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर कार्ड रद्द होणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती. ही बातमी निराधार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. भारत सरकारचं अधिकृत ट्विटर हँडल असणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या दाव्याबाबत तपास केला असता सत्य समोर आलं आहे. त्यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.
कुछ मीडिया रिपोर्ट्स में दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार ने राज्य सरकारों को निर्देश जारी किए हैं कि तीन महीने तक राशन नहीं लिए जाने की स्थिति में राशन कार्ड रद्द किया जा सकता है। #PIBFactCheck:- यह दावा फर्जी है। केंद्र सरकार ने ऐसे कोई दिशा-निर्देश नहीं दिए हैं। pic.twitter.com/2ujrspote2
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 18, 2020
पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. रेशन कार्डवर तीन महिने धान्य खरेदी केली नाही, तर ते रद्द करण्यात यावं अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे असा मेसज जोरदार व्हायरल झाला होता. मात्र केंद्र सरकारने राज्यांना अशी कोणतीही सूचना दिलेली नाही. हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफ होणार असे काही मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. पण ते देखील खोटं होतं.
सप्टेंबरपासून वीज बिल माफ केले जाईल असा दावा केला गेला. याबाबत अधिक चौकशी केली असता. त्याबाबतचं सत्य समोर आलं. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB) हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं होतं. फॅक्ट चेकमध्ये सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही असं सांगण्यात आलं. वीज बिलाची बातमी खोटी आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं. अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचा इशारा देखील पीआयबीने दिला आहे. त्यामुळे व्हायरल होण्याऱ्या खोट्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवून नये.
आपल्याला आलेल्या एखाद्या संशयास्पद मेसेजचं करता येतं फॅक्ट चेक; जाणून घ्या कसं? https://t.co/lQo9Sm0P22#Bank#money
— Lokmat (@MiLOKMAT) December 18, 2020