Ration Home Delivery: रेशन दुकानावर जायची गरज नाही! झोमॅटोसारखी होम डिलिव्हरी होणार, अशी द्या ऑर्डर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 11:38 PM2022-04-21T23:38:46+5:302022-04-21T23:39:26+5:30
Ration Home Delivery service in Marathi: झोमॅटो, स्वीगी, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जशा खाद्यपदार्थ घरपोच देतात तशीच सेवा आता रेशनची देखील मिळणार आहे. 22 राज्यांत याची सुरुवात झाली आहे.
झोमॅटो, स्वीगी, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या जशा खाद्यपदार्थ घरपोच देतात तशीच सेवा आता रेशनची देखील मिळणार आहे. यामुळे रेशन दुकानांवर रांगा लावाव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने याची सुरुवातही केली आहे. (Ration Service Umang App)
घरपोच रेशनची सुविधा आता उमंग अॅपद्वारे घेता येणार आहे. उमंग अॅपद्वारे तुम्ही घरबसल्या महिन्याचे रेशन सरकारी दरांवर आरामात मागवू शकणार आहात. देशातील २२ राज्यांमध्ये ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या अॅपवरून रेशन बुक करण्यासोबत तुम्ही जवळचे दुकान कुठे आहे हे देखील शोधू शकणार आहात. याचसोबत अन्न धान्याची किंमतही पाहू शकणार आहात. रेशन दुकानावर ज्या वस्तू मिळतात त्याच्या दरांची किंमत तुम्ही पाहू शकता.
केंद्र सरकारची ही सेवा सर्वसामान्यांपर्यंत थेट आणि वाजवी दरात वस्तू पोहोचवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार शासकीय दराने वस्तू खरेदी करता येणार आहेत. कार्डधारक रेशन दुकानाची अचूक माहितीही घेऊ शकतो.
कार्ड धारक याद्वारे सहा महिन्यांच्या खरेदीची माहितीही मिळवू शकणार आहेत. सोबत मराठी, हिंदी-इंग्रजीसह तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, आसामी, ओडिया, बंगाली, उर्दू, गुजराती यासारख्या १२ भाषांमध्ये माहिती मिळणार आहे. UMANG App वर गॅस कनेक्शनपासून ते पेन्शनपर्यंत, EPFO सह 127 विभागांच्या 841 हून अधिक सेवा उपलब्ध आहेत.