रतलामचे सोन्याचे दागिने कुणाच्या गळ्यात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:19 AM2024-05-09T08:19:23+5:302024-05-09T08:19:36+5:30

रतलाम मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ होता. २०१४ मध्ये भाजपने प्रथमच याठिकाणी विजय मिळवला.

Ratlam's gold ornaments will fall on whose neck? | रतलामचे सोन्याचे दागिने कुणाच्या गळ्यात पडणार?

रतलामचे सोन्याचे दागिने कुणाच्या गळ्यात पडणार?

- विनय उपासनी
लोकमत न्यूज नेटवर्क
देशाच्या मध्यभागी असलेला मध्य प्रदेशातील रतलाम हा एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ. अनुसूचित जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे गुमनसिंह दामोर विजयी झाले. यंदा काँग्रेसचे कांतीलाल भुरिया आणि भाजपच्या अनिता चौहान यांच्यात लढत आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी रतलाम अतिशय प्रसिद्ध आहे.

रतलाम मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ होता. २०१४ मध्ये भाजपने प्रथमच याठिकाणी विजय मिळवला. काँग्रेसमधून भाजपात आलेले दिलीपसिंह भुरिया हे येथे निवडून आले. मात्र, २०१५ मध्ये त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कांतीलाल भुरिया यांचा विजय झाला. मात्र, २०१९ मध्ये पुन्हा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे...
रतलाम मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असल्याने याठिकाणी आदिवासींच्या मतांना अधिक महत्त्व आहे. 
आरक्षण विषय येथे अधिक मजबूत आहे. काँग्रेसने प्रचारात आरक्षण हा मुद्दा आणला आहे.

२०१९ मध्ये काय घडले?
गुमानसिंह दामोर
भाजप (विजयी)
६,९६,१०३

कांतीलाल भुरिया
काँग्रेस (पराभूत)
६,०५,४६७
 

Web Title: Ratlam's gold ornaments will fall on whose neck?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ratlam-pcरतलाम